पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/165

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४ था. १५७ माझा कंठ दाटून आला आहे ! आणि त्यामुळे माझ्या तोंडांतून एक शब्द देखील निघत नाहींसा झाला आहे ! माझ्या राजसा ! देवी तुझ्याच घोर चिंतेने तेथे विव्हळ होऊन पडली आहे ! तर बाळा, तिला प्रेमानें चुंबन देऊन तिची समजूत कर ! माझ्या गुणनिधाना ! तुला काळाने ओढून नेले होते रे ! परंतु ( श्रीज्ञानेश्वरमहाराजांकडे बोट दाखवून ) या सद्गुरूंनी काळाच्या तोंडांत मारून ( बाळकृष्णाचे चुंबन घेऊन ) हे त्रिभुवनींचे भांडार माझ्या हातीं परत आणून दिलें ! ( बाळकृष्णा खाली उतरून पळत पळत आईजवळ जातो. ) | बाळकृष्णा- आई ! आई ! ए आई ! माझ्याशीं बोल किग ! माझ्या आंगावरून हात फिरवून मला जवळ घे किग ! तुं जर माझ्यावर अशी रागावलीस तर मला कोण ग जवळ घेईल ? आईग ! हे पाहा मी आपले तोंड पुढे केले आहे ! तर प्रेमानें माझे चुंबन घे किग ! आई ! मला फार भूक लागली आहे ग ! आई ! आईग ! आतां राग सोड किग ! आई ! मी इतका विनवितों आहे, तरी अजून तू कां ग उठेनास १ । | सीताबाई-( मुलाचा शब्द ऐकून झोपेतून जागी झाल्याप्रमाणे खडबडून उठून बसते व बाळकृष्णास पाहून त्यास पोटाशी घट्ट धरून त्याचे चुंबन घेऊन व त्याचे मुख कुरवाळून साश्चर्य चहूंकडे पाहून ) बाळा ! इतका वेळ कुठे रे गेला होतास ? पाडसा ! मी तुझ्यावांचून दीन किरे झाले होते ! माझ्या जिवीच्या विसाव्या ! आता पुन्हा नाहीं ना तू मला सोडून असा कुठे दूर जाणार ? बाळकृष्णा- ( आईच्या गळ्यास मिठी मारून ) आईश १ तातमहाराज कोठवर आले, हे पाहण्याकरिता मी गच्चीवर चढलो होतों ग ! तो तेथून पाय घसरून खाली पडलों ! तेव्हां हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले लक्ष्मीकांत श्रीविष्णु माझ्या पुढे एकदम येऊन उभे राहिले, आणि त्यांनी मला चटदिशीं कडेवर उचलून घेतलें ! इतक्यांत स्वगतून एक विमान खाली उतरले ! त्या विमानांत भगवान् मला घेऊन बसले ! आणि मी भगवंतांच्याबरोबर वैकुंठाला गेलों ! आई, तेथली मौज १४।