पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/166

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ श्रीज्ञानेश्वरमहाराज. मी तुला काय ग सांगू ? तेथे गेल्यावर भगवान् एका सिंहासनावर बसले आणि मला मांडीवर घेऊन त्यांनी माझे प्रेमानें चुंबन घेतलें ! अमळशाने मला तुझे आणि तातमहाराजांचे स्मरण झालें ! पण तुह्मी दोघेही मला कोठे दिसांना ! तेव्हा मला भूक लागली आहे, मला आईकडे घेऊन चला, असे मी भगवंतांना झटलें ! तेव्हां त्यांनी माझ्या मुखांत अमृत घातलें ! आई ग ! त्या अमृताची गोडी माझ्या तोंडांतून अजून किंग गेली नाहीं ! आई ग ! इतक्यांत ( श्रीज्ञानेश्वरमहाराजांकडे बोट करून ) या संतश्रेष्ठांचे मला स्मरण झाले ! हे पूजा ग्रहण करण्याकरितां घरीं आले असतील, माझी वाट पाहात असतील, मी कोठे आहे ह्मणून तुला विचारीत असतील, असे माझ्या मनात येत आहे तोंच भगवान् श्रीविष्णूनी (श्रीज्ञानेश्वरमहाराजांकडे पुनः बोट करुन) हैं सद्गुरुस्वरूप धारण केलें; आणि मला हात धरून या स्वरूपानेच भगवान् मला घेऊन येथे परत आले ! आई ग ! तर आतां ऊठ लवकर, आणि माझ्या हातून या सद्गुरुस्वरूपी भगवान् श्रीविष्णूचे पूजन करीव ! सीताबाई- ( आनंदाने उठून बाळकृष्णास कडेवर घेऊन त्यास श्रीज्ञानेश्वर महाराजांचे चरणांवर आणून घालते व आपण स्वतः श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे पाय घट्ट धरून बसते ) अहो सद्गुरुसमर्था! आपण या आपल्या धर्माच्या बाहणीला हे पुत्रदान देऊन आज धन्य केलं ! सदुरुनाथा ! या आपल्या उपकाराबद्दल मी आपली कशी उतराई होऊ ? मी आपल्याला काय अर्पण करूं ? मी आपला धन्यवाद किती गाऊ ? माझे हें सुखनिधान मला आज लावल्यामुळे, यावेळी मी आनंदानं अगदी वेडी झाले आहे ! माझा कंठ दाटून आला आहे ! मी काय करूं, काय बोलू, हैं। मला कांहींच सुचत नाहींसं झालं आहे ! ह्मणून हे सद्रुचरण मी घट्ट धरिले आहेत ! राजकुलगुरु-अहो सदुरुसमर्था, ही देवी आणि हा राजा । ही उभयतांही यावेळी अत्यानंदानं अगदी वेडावून जाऊन गोंध ठून गेली आहेत ! त्यांचे देहभान यावेळी सर्वस्वी नष्ट झाले