पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/167

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४ था. १५९ आहे ! तरी समर्थांनी त्यांच्या मस्तकांवर हात ठेवून त्यांना देहावर आणावे, आणि त्यांना उपदेशामृत पाजून त्यांचे अज्ञान दूर करावें ! ( रामराजा व बाळकृष्णा श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या चरणांवर मस्तक ठेवितात.) ज्ञानेश्वर-अहो राजकुलगुरु ! तुम्हासारखे ज्ञानवृद्ध राजाला उपदेशामत पाजण्याकरितां नित्य सन्निध असल्यावर मी ते याला अधिक काय सांगणार ? ( श्रीज्ञानेश्वरमहाराज रामराजा, सीताबाई व बाळकृष्णा यांच्या मस्तकांवर हात ठेवितात. ) हे राजश्रेष्ठा ! आणि अहो मातोश्री ! आतां उठा ! ( त्रिवर्ग उठून श्रीज्ञानेश्वरमहाराजांपुढे हात जोडतात. ) राजा ! विषभक्षण करून त्यावर अमृतपान केले असतां, जसे सर्व अनर्थ चुकतात, त्याप्रमाणे अगोदर हातून उदंड दुष्कृत घडल्यावर जर शेवटीं पोटीं अनुताप उत्पन्न झाला तर मागील सर्व पात जळून जातात ! हे राजश्रेष्ठा, तुला आतां अनुताप झाल्यामुळे, तुझा भवरोग दूर गेला आहे ! तर आतां दांभिक अभिमान टाकून, आंगीं सात्विक गुण धर. सर्वांमध्ये धर्म हा श्रेष्ठ आहे ! याकरितां सदा धर्मावर चित्त ठेवून अनादिकालापासून सज्जन तो जसा आचरीत आले आहेत, त्याप्रमाणे तो तू आचरीत जा. कुल, शील, विद्या, धन, राज, तप, रूप व यौवन, या अष्टमदांनी आपले मन भुलू देऊ नको. धर्मानेच राज्य मिळवून त्याचें धर्मानेंच रक्षण करीत जा. अविहित अनाचारकर्मी प्रवृत्त होऊ नको सत्पात्री दान देऊन, दीन जनांचे क्लेश हरण करीत जा. वेद हे जसे ब्राह्मणांचे बांधव आहेत, त्याप्रमाणे मंत्री हे राजाचे बांधव आहेत ! ह्मणून धर्मशील प्रधान नेमून प्रजेचे पुत्रवत् पालन कर. स्त्रिया, ब्राह्मण, साधु, यांना दंडूं नको. देव-विप्नांचे वेतन चालवीत जा. कोणी सेवक व प्रधान प्रजेला पीडा करतील, तर त्यांना पदा • वेगळे करीत जा. आश्रित, उपाध्ये, ऋत्विज, ब्राह्मण, हे अनुष्ठान, जप, तप, याग, पुरश्चरण, हीं यथासांग करितात किंवा नाही, हे नित्य पाहून, आपल्या कृतीने, आपल्या वाणीनें,