पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/168

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० श्रीज्ञानेश्वरमहाराज. आपल्या दृष्टीने, आणि आपल्या मनाने, सर्व प्रजा नेहमी संतुष्ट ठेवीत जा. सर्वभूतीं नारायण आहे, अशा भावनेने अन्नदान करीत जा. मी तुला बहुत काय सांगावे ? मनयाज्ञवल्क्यस्मतियक्त आपलें वर्तन ठेव. ही राजनीति भारतत विदुराने धृतराष्ट्राला सांगितली आहे. तिचे मनन करून त्याप्रमाणे वागत जा. ह्मणजे लाभ आणि सौख्य ही तुला प्राप्त होतील. दुर्जनांच्या बुद्धीचा त्याग करून सत्संग धर. साधुसंतांचे आशीर्वाद घेत जा. गुरुवचनीं सदा सादर रहात जा. कुमार्ग टाकून सन्मार्गाने वाग. आणि साधुजन पाळून हरिभजनीं आंग झिजव. विषयांवरील आदर सांडून, कामक्रोधादि शत्रूना आपल्या पराक्रमाने दुमवून टाक. इंद्रिये स्वाधीन ठेवून, नित्य नैमित्तिक कर्मे यथासांग करीत जा. अहोरात्र आपल्या हातून पापपुण्य किती घडले, हे मनाला विचारून, भावभक्तीने श्रीहरीचे पूजन करीत जा. अभिमान सांडून संतांचें दास्य कर. संतमुखाने वेदांत श्रवण करून, हरिकीर्तन ऐकत जा. संतश्रेष्ठांना आपले तन, मन, धन अर्पून त्यांची सेवा करीत जा. ऋणजे तुला ते मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवून देतील. राजा, संतसेवा है। मोक्षाचे साधन आहे. याकरितां सदैव त्यांची संगत धर; ह्मणज ते तुझे अपेक्षित तुला सांगतील. त्यांच्या संगतीने तुझ्या अंतःकरणास बोध होऊन, तुझे मन कल्पनारहित होईल, आणि तुझ्या त्रिविध वासना मावळतील. त्यांच्या कृपन् तुला सर्वत्र नारायण दिसू लागेल ! आणि अशा राता" शुद्ध ब्रह्म तुजपुढे येऊन उभे राहिले ह्मणजे, तू इहलोकी उदंड कीर्ति आणि अपार सुख संपादून, देहत्यागानंतर चिन्म यपदाची जोड मिळावशील ! ( राजा, राणी व बाळकृष्णा श्रीज्ञानेश्वर महाराजांचे पूजन कर तात, व त्यांस ओवाळून त्यांचे पादतीर्थ सेवन करतात. तर श्रीज्ञानेश्वरमहाराज आपल्या कंठांतील तुळसीकाष्ठमाला राजा गळ्यति प्रसाद ह्मणून घालतात. तेव्हां राजा त्यांस साष्टा