पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/169

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४ था. १६१ नमस्कार घालतो. नंतर राजा, राणी व बाळकृष्णा हीं नामदेवादि संतांस नमस्कार घालतात. ) | नामदेव- राजा, ज्ञानरायांनी आपल्या कंठांतील तुळसीकाष्ठमाला तुझ्या गळ्यांत घातली आहे, ही तू अखंड गळ्यांत वागव ! आणि आह्मां संतांचे श्रेष्ठ भूषण जी ही पताका ती मी तुझ्या हाती देत आहे, (पताका राजाच्या हातांत देऊन ) ही हाती घेऊन विठ्ठल नामाचा घोष करीत, पंढरीसीजावेंजीवन्मुक्तव्हावें ॥ जीवलगाभेटावेविठोबासी॥ १॥ कायावाचामनचरणींठेवावें ॥ प्रेमसुखमागावेपंढरीनाथा ॥ २ ॥ सुखाचेसाजरेश्रीमुखपहावें ।। जीवेंउतरावेंलिंबलोण ॥ ३ ॥ नामाह्मणेआह्मादीनांचे माहेर ॥ गातांमनोहरगोडवाटे ॥ ४ ॥ ( पडदा पडतो. )