पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/17

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १ ला. देवानं बुद्व दिलीन् ! नी भोळ्या उमाबाईला देखील काय भुरळ पडली, तों तिनं या विठ्याला घरजावई करा, असा सिदोपंतापाशी आग्रह धरिला ! बायकोचा शब्द, सिदोपंतांना खाली टाकवेना, तेव्हां विठ्ठलपंत झाले घरजावई ! रुक्मिणीबाईसारखी सुशील, चतुर नी निष्ठावंत बायको, लाखांत एक देखील सांपडायची नाहीं हो ! पण ह्याला काय त्याचं होय ! एक दिवस हा गेला तिला सोडून, नी यानं घेतला संन्यास ! घी देखलं पण बडगा नाहीं देखला, तसं यानं सोन्यासारखी बायको टाकून संन्यास घेतला खरा, पण मागून हे बुवा झाले बाबरे, नी मग आले वाराणशीहून बायको हुडकत अलंकापुरीला परत ! जान्हवी- ( धुणीं दुरडीत भरतांना थांबून ) कां वल्लरी, आतां ग कां तुझं तोंड शिवलं ? मेले 'कर्मभ्रष्टी नी सदा कष्टी !? अशांना का तू देव म्हणणार ? उत्तरा-: ( लुगडे झाडतां झाडतां ) खरंच पुसशील तर जान्हवी, मला असं वाटतं की, या मेल्या पापिष्टांना अलंकापुरींतल्या ब्राम्हणांनी नुसतं वाळीत टाकलं, हा यांच्या पापाच्या मानानं फारच थोडा दंड झाला ! यांना किनई, भर दोनप्रहरी तापल्या तव्यावर उभं करून यांच्या अंगाला विंचू डसवायला हवे होते ! नी अशा धर्मभ्रष्टाच्या पोटी आदल्या जन्मींचे कोण जले घोर पापी प्राणी आलेले ! नी यांना ह्मणे शुद्ध करून घेऊन यांच्या मुंजी करायच्या ! अग, अशा जातिभ्रष्टांना कांहीं केल ह्मणून शुद्धता थोडीच यावयाची आहे ? ह्या गंगेच्या पाण्याने साता जन्मांची पापं धुतली जातात, म्हणून यांत अंग धुतलेले महारमांग कधी पाहिले आहेस का ब्राम्हण झालेले ? ( त्रिवेणी पूजा-साहित्य घेऊन येते. ) जान्हवी- ( धुण्याची पाटी कमरेवर घेऊन ) उत्तरे, उर्मिळे, वल्लरीची पाठराखीण आली ग बाई ! आता तोंडाला खीळ घाला हो ! कां ह्मणून नाहीं पुसलंत ? हिचे यजमान किनई आतांशी त्या कारट्यांना ईश्वर ह्मणायला लागले आहेत हो ! कां ? तर ह्मणे ते दिवशी त्यांनी आपले वडील या वल्लरीच्या घरीं श्री