पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/170

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ५ वा. -- प्रवेश पहिला. स्थळ- श्रीवाराणसी ( काशी ) क्षेत्र. मुद्गलाचार्याचा यज्ञमंडप. ( यज्ञकुंडांत नुक्तीच पूर्णाहुति पडून कुंडांतील हुताशन हळूहळू शांत होत चालला आहे, यज्ञ करणारे ऋत्विज, ब्राह्मण व यजमान मुद्गलाचार्य, यज्ञमंडपांत अग्रपूजेकरितां एक उच्चासन मांडून, त्याच्या सभोंवतीं विचार करीत बसले आहेत व त्या उच्चासनाजवळ अग्रोदक कलश व गंधचंदनपूष्पादि पुजासाहित्यांनी भरलेली पात्र ठेविलेली आहेत, असा पडदा उघडतो. ) मुद्गलाचार्य-अहो श्रेष्ठहो, एका गृहींचच द्रव्य मिळेल, तव्हांच महायज्ञ करावयाचा, असा जो हेतु मी बहुतकालपर्यत मनांत धरला होता, तो माझा हेतु श्रीविश्वेश्वरांनी आज शेवटास नेल्यामुळे मला थोर धन्यता वाटत आहे ! मथुराधिपति पिपाजा राजे यांनी आपले पुत्र आदीप राजे यांच्याकरवीं या यज्ञाकरिता मला पंचवीस सहस्र होन देवविले, ह्मणूनच एक संवत्सरपर्यंत हा यज्ञ यथासांग चालून आज पूर्णाहुति होऊन त्याची निर्विन्नपणे समाप्ति झाली ! या महायज्ञाच्या थोर पुण्याचे अधिकारी पिपाजी राजे आणि त्यांचे पुत्र आदीप राजे हेच सर्वस्वी आहेत. या वाराणसी क्षेत्रांतील आणि अयोध्या, मथुरा, माया, कांचा, अवंतिका आणि द्वारका अशा सप्तपुयांतील तुह्मांसारखे वेदज्ञ संकलशास्त्रविशारद, व्यास, वसिष्ठ, याज्ञवल्क्यतुल्य श्रेष्ट ऋत्विज या यज्ञास मिळाले, म्हणूनच यज्ञांत कांहीं एक न्यून न प" वसुधारा अखंड चालून जातवेद तृप्त झाला ! आता एकदा कोणी तरी जगद्गुरु समथास या अग्रपूजासनावर बसवून या माझ्या हा वनि मी त्यांची अग्रपूजा केली, झणजे मी कृतार्थ झालो ! श्रेष्ठहो, या कलियुगांत जगदुद्धाराकारतां शिव, विष्णु ब्रह्मा आणि