पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/171

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ५ वा. १६३ आदिमाया चिच्छक्ति, यांनी श्रीनिवृत्तिनाथमहाराज, श्रीज्ञानेश्वर. महाराज, सोपानदेव आणि मुक्ताबाई हीं नांवें धारण करून, या भूतलावर अवतार धारण केले आहेत, व सांप्रत या ईश्वरविभूति भूवैकुंठ पंढरीक्षेत्राहून समागमें वीस हजार वैष्णवसंत घेऊन तीर्थाटनाच्या निमित्ताने जड जीवांचा उद्धार करीत हिंडत आहेत ! हैं। तुह्मांस माहीत आहेच. पंढरीहून निघाल्यानंतर या जगद्गुरुंनीं आरणभेंडी, लऊळ, बार्शी, जोगाईचे आंबे, क-हाड, तेर, कपिलधारातीर्थ, औंढ्या नागनाथ, प्रतिष्ठान, देवगिरी, वगैरे प्रांतांतील भाविक जनांस भाक्तमार्गास लावून, वेरूळ, घृष्णेश्वर, कचेश्वर, शुक्रेश्वर, पंचवटी, त्र्यंबकेश्वर, द्वारका, डाकूर, इत्यादि तीर्थं आ पल्या चरणरजानें शुद्ध केलीं ! आणि तेथून हे जगद्रु जुनागड प्रांत, प्रयाग, भारद्वाजाचा आश्रम, लोपामुद्रेचे स्थान, अयोध्या, पलखपुकार आश्रम आणि चित्रकूट इत्यादि स्थळे पावत्र करीत करीत कालच या पंचक्रोशीत आले आहेत ! तर श्रेष्ठहो, मला असे वाटते की, साक्षात् श्रीविष्णस्वरूप श्रीज्ञानेश्वरमहाराज, ना प्रार्थना करून या यज्ञमंडप घेऊन यावे, आणि त्यांना या पूजासनावर बसवून त्यांचे पूजन करावें ! ह्मणजे शुकाचार्यांच्या आगमनानें धर्मराजाचा राजसूय यज्ञ जसा पूर्ण झाला, त्याप्रमाणे श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या आगमनाने हा आपला यागही पूर्णतेप्रत पावेल ! | बिंदुमाधव शास्त्री- योग्य ! योग्य ! का,दीक्षित, आचार्यांची योजना उत्तम आहे, नाहीं ? | विरेश्वर दीक्षित- शास्त्रीबुवा, उत्तम म्हणून काय विचारता ? फारच उत्तम ! सर्वोत्कृष्ट ! अहो, मुद्गलाचार्याचा विचार ! मग तो वावगा कसा असणार ? । त्रिलोचन भट- अहो शास्त्रीबुवा, अहो दीक्षित, शांतं पापं ! शांतं पापं ! अहो काय, म्हणतां काय ? तुह्मी का त्या भ्रष्ट कारट्याला अग्रपूजेचा मान देणार ? गोविंदबुवा पुराणीक- अहो भटजी, अहो घाबरू नका । दीक्षित आणि शास्त्रीबुवा आचार्याचा हा अमंगळ विचार ऐकून,