पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/172

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ श्रीज्ञानेश्वरमहाराज. त्यांचा उपहास करीत आहेत ! हे नाही वाटते तुमच्या ध्यानांत आलें ? अहो आचार्य ! तुम्हांसारख्या वेदतज्ञानी, शास्त्रज्ञ आणि पूर्ण धर्माभिमानी श्रेष्ठांच्या मनांत जेव्हा हा असला अत्यंत अमंगल विचार येऊ लागला, तेव्हा या कलियुगांतील वर्णसंकरकाल अगदीच समीप आला, असेच म्हटले पाहिजे ! आम्ही तर अज्ञानीच आहों ह्मणा, पण| दंडपाणी गंगापुत्र- अहो पुराणीकबुवा, पण म्हणून तितकेच कां थांबला ? अहो, बोला ! स्पष्ट बोला ! अहो, अनादिकालापासून चालत आलेल्या धर्माविरुद्ध आचरण करू पाहणारा जरी श्रेष्ठ, वंद्य आणि विद्वान असला, तरी स्पष्ट शब्दांनी त्याचा निषेध करण्याचा आपल्यासारख्या धर्मरक्षकांना पूर्ण अधिकार आहे ! तेव्हा येथे भीड धरण्याचे कांहींएक कारण नाहीं ! आणि आपल्याकडून निर्भिडपणा होत नसेल, तर मी सांगतों ! अहो आचार्य, हा आपला विचार आह्मां कोणालाच यत्किंचितही पसंत नाहीं ! का धर्माधिकारी, असेच की नाही ? धुंडिराज धर्माधिकारी-अहो गंगापुत्र, तुह्मी सांगितलें, ते अगदी यथार्थ आहे ! अहो, नवखंडांतून या यज्ञाकरिता येथे आलेले साक्षात् कपिल, याज्ञवल्क्य, ब्रह्मपुत्रतुल्य असे हे ऋत्विज अग्रपूजेचे योग्य अधिकारी असता, यांचा अपमान करून, त्या जातिहीन, वर्णहीन आणि धर्महीन भ्रष्ट पोराला पूजासनावर बसवून त्याची पूजा करण्यास जेव्हा हे आचार्य सिद्ध झाले, तेव्हां खचीत खचीत आचार्यांच्या देहांत यावेळी कलीनेच संचार केला आहे ! आणि तोच आचार्यांच्या मुखातून अशी हाँ अभद्र वचने काढीत आहे ! यांत यत्किंचित् संशय नाहीं ! अहा आचार्य, वेळीच श्रीविश्वेश्वरांचे आणि काळभैरवांचे स्मरण करा ! झणजे तो कलिपुरुष भिऊन, तुह्मांस सोडून निघून जाईल ! आणि भ्रष्ट झालेली ही तुमची धर्मबुद्धि पुन्हा शुद्ध होईल ! विश्वेश्वर पंडे-नाहीं पण, अहो धर्माधिकारी, आचार्यांना अगोदर असे विचारा की, हा धडधडीत सन्याशाच्या पोटीं आलेला भ्रष्ट कारटा ।