पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/173

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ५ वा. १६५ ज्याची सावली पडली तर सचेल स्नान करावे, आणि ज्याचे तोंड पाहिले तर प्रायश्चित्त घ्यावे, असे धर्मशास्त्र सांगत आहे, अशा भ्रष्टाला या यज्ञमंडप आणून, त्याला या पूजासनावर बसविण्याचा जो धर्मबाह्य विचार आचार्यांनी मनांत आणिला आहे, तो त्यांनी या पोरांत असा कोणता पुरुषार्थ पाहिला आहे ! धुंडिराज धर्माधिकारी-काय हो मुद्गलाचार्य, आह्मां सर्वांची नाकें कापून, त्या भ्रष्टाचे पूजन करण्यास जे तुह्मी तयार झालां, तो त्याने असा कोणता पुरुषार्थ संपादिला आहे तो सांगा पाहूं ? तो का वेद पढला आहे ? का त्याने शास्त्र अवलोकन केले आहे ? का जप तप आचरलें आहे ? अहो, जन्मादारभ्य त्याला ब्रह्मसंस्कार ह्मणजे काय हे माहीत नाहीं ! का अद्यापि त्याचे उपनयन झालें नाहीं ! त्यानें केशव नारायण ह्मणून संध्येची दोन आचमने कधीं टाकिलीं नाहींत! का गायत्री मंत्र कानांनी ऐकला नाहीं ! आणि अशा पोराला जेव्हा तुह्मी पूजासनी बसवावा म्हणून म्हणतो, तेव्हां खरोखर मी मघाशीं ह्मटले त्याप्रमाणे तुमच्या देहांत कलिसंचार झाला आहे, हेच खरें ! मुद्गलाचार्य- अहो धर्माधिकारी, अहो गंगापुत्र, अहो पंडे, अहो भटजी, अहो पुराणीकबुवा, अहो दीक्षित आणि अहो शास्त्रीबुवा, त्या परात्पर जगद्गुरूंबद्दल अशीं निंदावचनें बोलून आपली जिव्हा कां विटाळून घेतां ? आणि अक्षय्य नरकाचे साधन कां करून ठेवितां ! अहो, वेदशास्त्र अवलोकन करून करून शिणलेल्या तुमच्या या नेत्रांनीं जगद्गुरु श्रीज्ञानेश्वरमहाराजांचें तें साक्षात् श्रीविष्णुस्वरूप जर तुह्मीं एकवार पाहाल, तर तुह्मी ब्रह्मानंद डुलू लागाल ! अहो श्रेष्ठहो, नवखंडांतील वैराग्याने तप्त झालेले लक्षावधि तपस्वी, आणि संसारावर तिलांजलि सोडून विरक्त चित्ताने सर्व भूतलावर इतस्ततः भ्रमण करणारे कोट्यवधि याति, संन्यासी आणि बैरागी, जगद्गुरुंचा तो पूर्णमुखचंद्र पाहून, श्रमरहित होत्साते श्रीहरीच्या स्वरूपध्यान निमग्न झाले आहेत ! आणि जप, तप, अनुष्ठान, यज्ञयागादिक