पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/174

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६६ श्रीज्ञानेश्वरमहाराज. करणान्या असंख्य ब्रह्मश्रेष्ठांचे आणि गिरिकंदरीं वज्रासनावर बसून योगसाधनीं रत झालेल्या महंतांचे नेत्र, सद्गुरुदर्शनाने निवून, ते ब्रह्मानंदसुखांत निमग्न होऊन गेले आहेत ! तरी श्रेष्ठहो, ही कुटिलबुद्धि सांडून त्या जगद्गुरूंना अनन्य भावानें शरण चला ! म्हणजे त्यांच्या कृपादृष्टीने तुमचा हा मिथ्याभिमान नष्ट होऊन, तुम्हांस शुद्ध परब्रह्माची ओळख होईल ! विरेश्वर दीक्षित- हाही ! हाही ! हाही ! अहो शास्त्रीबुवा, या पोराने जारणमारणउच्चाटण शिकून, दक्षिणप्रांती, भोळ्या लोकांच्या बुद्धि गुंग करून टाकून, ईश्वरभक्तीचे नसतेच स्तोम माजविले आहे, ह्मणून आजपर्यंत आपण कानांनीच ऐकत होतो ! पण आचार्याच्या या स्थितीकडे पाहून, त्याची साक्ष आज आपल्या नेत्रांनाही पूर्णपणे पटत आहे ! त्या पोरट्याला या पंचक्रोशीत येऊन आठ प्रहर लोटले नाहीत, तोच त्याने आचायना आपल्या विद्येने इतके वेडे करून सोडले की, ते त्या भ्रष्टाला या यज्ञमंडप आणून आणि त्याला या पूजासनावर बसवून, या कलशांतील अग्रोदकाने त्यास स्नान घालण्यास आणि येथे सिद्ध करून ठेविलेल्या षोडशोपचारांनी त्याचे पूजन करण्यास तयार झाले ! अहो आचार्य, या पात्रांतील सुगंध चंदनाची उटी त्या पातक्याच्या अंगाला लावून, या पुष्पमाला त्याच्या गळ्यांत घालाव्या, असे जेव्हा तुह्मी ह्मणं लागला, तेव्हां खचीत खचीत त्याच्या जारणमारणसिद्धि फारच जाज्वल्य दिसतात ! विश्वेश्वरा, आह्मांस या संकटांतून मुक्त करणारा आतां तूच एक समर्थ आहेस ! बिंदुमाधव शास्त्री- अहो दीक्षित, असे भतां काय ? अहो, त्या पोराची ती काय कथा ! आचाय, अहो आचार्य, या भ्रष्टानें शुद्र, शिंपी, सोनार, कसाई, कलाल, चर्मक, अशा बारा जाती एकत्र जमवून, वेदप्रणित धर्माची सर्वत्र बंडाळी माजविली आहे ! तेव्हां अशा धर्मविध्वंसकाला राजाकरवी देहांतशासन करविण्याचे एकीकडे ठेवून, तुम्ही त्याला या पूजासनावर बसवून त्याचा गौरव करूं म्हणतां ! अहो, असे नुसते शब्द तो डान उच्चारणे सुद्धा महत्पाप आहे ! आणि तुम्ही जर तसे आचरणही