पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/175

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ५ वा. १६७ करू लागला, तर या धर्मग्लानीस प्रवृत्त झाल्याबद्दल अनंत ब्रह्महत्यांचे घोर पाप डोक्यावर घेऊन, तुम्ही अक्षय्य रौरव नरकाचे साधन मात्र करून ठेवाल ! । | त्रिलोचन भट-अहो आचार्य, तुम्हीच आजपर्यंत आह्मांला धर्म सांगून, आणि धर्मकृत्यांत आह्मांला साहाय्य करून, तुह्मी स्वतःच असे अधर्माचरणी प्रवृत्त होऊ पाहतां, तेव्हां खरोखर तुम्ही त्या परमभ्रष्ट बीरमांत्रिकाच्या तडाक्यांत सांपडला, यांत कांहीं संशय नाहीं ! अहो आचार्य, त्या पोराबद्दल काय ही विलक्षण भावना तुह्मीं पोटीं धारण केली आहे ! अहो अठरापगड जाती गोळा करून, अहोरात्र टाळ कुटल्याने जर वैकुंठपीठ हाती येते, तर तुमच्या आमच्या आजापणज्यांनी कोट्यवधि टाळ फोडले असते ! मग हो त्यांनी सर्व आयुष्यभर घसा फुटेपर्यंत वेद घोकण्याची आणि शास्त्रग्रंथांचे ढीग उलथे पालथे करण्याची यातायात का केली असती ? देवांपुढे जन्मभर घंटा बडविण्याचे आणि देवांच्या डोक्यावर पाणी ओतून तुळशीबेलफुलांचे पर्वतांसारखे ढीग रचावयाचे श्रम तरी त्यांनी कशाला घेतले असते ? अग्निहोत्राच्या आणि यज्ञयागाच्या धुराने त्यांनी आपले डोळे कशाला हो फोडून घेतले असते ? आणि तीर्थयात्रेची पायपिटी आणि जपजाप्याची खटपट तरी त्यांनी कां केली असती ? कां शास्त्रीबुवा, दीक्षित, धर्माधिकारी, मी म्हणतो हे खरें कीं नाहीं है । | दंडपाणी गंगापुत्र- आणि तुम्हीं आह्मीं आचायच्याकारतां या यज्ञात सर्व कामें वांटून घेण्याच्या भानगडीत तरी कशाला पडलों असतों ! अहो, या यज्ञात ऋषि, यति, तापसी, ब्राह्मण यांच्या कोटिमूर्तीचे चरण धुतां धुता आणि त्यांच्यापुढे वांकतां वांकता आज एक वर्ष आमच्या कमरेचे टाके ढिले झाले! त्यांना धूपदीपांनी ओवाळतां ओवाळतां, सुपुष्पमाळा त्यांच्या गळ्यात घालता घालतां, त्यांना षड्रस अन्” वाढता वाढत आणि त्यांची उष्टीं काढत काढता आमच्या हातापायांचे तुकडे पडले ! त्यांना अर्पण केलेल्या वस्त्रांचे ढीग आणि त्यांना वांट