पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/176

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६८ श्रीज्ञानेश्वरमहाराज. लेल्या कॅक्षिणेच्या थैल्या उरापोटावर उचलंत उचलतो आणि हाताखांद्यावर घेतां वेतां आम्ही अर्धमेले झालो ! आणि खेरीज यज्ञांत कांहीं न्यून पडू नये ह्मणून, ऋत्विजांना जे उपचार लागले ते त्यांना पुरावले ! पुरोहितांना जी जी सामग्री लागली ती ता आणून दिली ! दीन, अनाथ, क्षुधितै, व्याधिष्ठ, आंधळे, पांगळे यांना अन्न देऊन तृप्त केलें ! या सकल ऋत्विजांनीही विधानाप्रमाणे हवन करून, देवांना अवदाने दिलीं ! आणि त्यामुळे सकल देव तृप्त झाले ! यज्ञधूम्रज्वाला स्वर्गापर्यंत पोहोंचून यज्ञनारायण संतुष्ट झाला ! यज्ञभोके श्रीकाशीविश्वेश्वर प्रसन्न झाले ! आणि इंद्रादि देवांनी संतुष्ट होऊन स्वर्गी घंटानाद केला ! असा है। अपूर्व यज्ञसमारंभ कधी झाला नव्हता, असे सर्वतोंडी झाले ! अहो आचार्य, अशा प्रकारे तुह्मांस आम्हीं त्रिभुवनीं धन्यता मिळवून देऊन, स्वर्गप्राप्तीसाठी या महायज्ञाचे महत्पुण्य जे आम्हा तुमच्या पदरी बांधून दिले, ते तुह्मी अखेर हा असला भ्रष्टाच्या पूजनाचा विचार मनांत आणून निरर्थक करून टाकीत आहा याचा कांहीतरी विचार करा ! विश्वेश्वर पंडे- अहो धर्माधिकारी, शास्त्रीबुवा, दीक्षित, मी तर असे ह्मणतों कीं, हा धर्मविध्वंसक पोरटा आपण होऊन आपल्या पायांनी चालत या अनादिश्रेष्ठ धर्मक्षेत्रीं अनायासच आला आहे; तेव्हां याला बहिष्कार घालून, याचे तीन पाट काढून, याला गईभावर बसवून, याची या पंचक्रोशीत भर दान प्रहरी धिंड काढावी ! ह्मणजे हा शुद्धीवर येऊन असला धर्मभ्रष्ट पणा सोडून मुकाट्याने बसेल! आणि हें वर्तमान आपण पृथ्वी वरील सर्व क्षेत्रस्थांस कळविले झणजे, सर्वांना चांगला धाक बसून, असे धर्मबाह्य आचरण पुन्हा कोणी कधीही करणार नाही ! काहो गंगापुत्र, पुराणीकबुवा, का असेंच कीं नाहीं ? गोविंदबुवा पुराणीक-यांत काय संशय ! त्याच्या भ्रष्ट आचाराबद्दल त्याला हाच दंड योग्य आहे! अहो आचार्य, सोडा सोडा आता ही असली भ्रष्टबुद्धि आणि हे शापादपि शरादपि, साक्षात् वेदोनारायण ज्यांच्या हृदयांत सदैव नांदत आहे, अशी