पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/177

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ५ वा. १६९ या निगमानिगमीं निपुण, याज्ञिक, महासमर्थ वित्रामध्ये हे बिंदुमाधव शास्त्री अग्रपूजेचे योग्य अधिकारी आहेत ! तेव्हा यांना या पूजासनावर बसवून, यांचे पूजन करा, आणि हा महायज्ञ करून संपादिलेले थोर पुण्य कायम रावा ! का हो गंगापुत्र, मी ह्मणतों हे सत्य आहे की नाही ? इंडपाणी गंगापुत्र- हो ! हो ! अहो एकबार नाही, त्रिवार सत्य आहे ! बिंदुमाधव शास्त्री आह्मां सर्वांत खरोखर तसेच श्रेष्ठ आहेत ! | विश्वेश्वर पंडे-अहो पुराणीका , अहो गंगापुत्र, अहो, या विरेश्वर दीक्षितांच्यासारखे पृर्ण ब्रह्मज्ञानी येथे असता, त्यांना एकीकडे टाकून बिंदुमाधवशास्त्रांना पूजासनी बसविणे, हे सर्वथा अयोग्य आहे ! का हो भटजी, तुह्मांला क वाटते ? त्रिलोचन भद- अहो गडे, शास्त्रीबुवांच्यापेक्षा दक्षतांचा अधिकार थोर आहे यांत तर शंकाच नाहीं ! पण हे गोविंदबुवा साक्षात् ज्ञानर्थ ! यांच्यापुढे शास्त्री काय आणि दीक्षित काय, उभयतांही वयातच ! का आचार्य, मी बोलतों में यथार्थ आहे कीं नाहीं ? । खुद्गलाचार्थ- श्रेष्ठहो, तुमच्या आमच्या थोर भाग्योदयाने श्रीज्ञानेश्वर महाराज, साक्षात् वैकुंठवासी श्रीविष्णु, यांचे चरण प्रक्षाळन आणि त्यांचे पादतीर्थ सेवन करून जीवन्मुक्त होण्याचा सुयोग प्राप्त झाला असतां, तो अंधपणाने दूर लोटून, तुझा आह्मांसारख्या यःकश्चित् पुरुषांत हा श्रेष्ठ, याहून ते श्रेष्ठ आणि त्याहन तो श्रेष्ठ, असा निरर्थक वाद का घालत बसतां ? अहो या साक्षात् लक्ष्मीकांत श्रीविष्णूचा पूर्ण मुखचंद्र या युगींही पाहून धन्य होण्याकरिता, मागाल युगायुगांचे भकचको गेल्यामुळे, त्यांनीही भगवंतांच्याबरोबर या युगीं अवतार धारण = केले आहेत ! आणि भगवंतांच्या सानिध्याचे अपार सुख ते सांप्रत सेवन करीत आहेत ! अहो, इतकेच नाही तर भगवंतांच्या बरोबर ते कीर्तनरंगी आनंदाने नाचून भगवंतांचीं अनेक युगांची चरित्रे गात आहेत ! श्रेष्ठहो, वैष्णवाग्रणी नामदेव, हे पूर्व युगीचे १५