पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/178

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७० श्रीज्ञानेश्वरमहाराज. उद्धव होत ! सज्जन कसाई हेच उद्दालक ! नरहरि सोनार हेच जबुवंत ! विसोबा खेचर हेच षडानन ! चांगदेव हेच मरुद्गण ! सच्चिदानंदवावा हेच अर्जुन ! आणि आपले क्षेत्रस्थ रामानंद हेच जनकराजे होत ! तेव्हां श्रेष्ठहो, माझी तुझांला करद्वय जोदून अशी प्रार्थना आहे की, या सकल भक्तश्रेष्ठांसह भगवान श्रीज्ञानेश्वर महाराज यांना या मंडप घेऊन येऊन, त्यांचे आपण घोडशोपचारे पूजन करूं ! आणि आपली मनरूपी सुकुमार सुमने त्यांच्या चरणी अर्पण करून, त्यांची मूर्ति अखंड हृदयांत सांठवून मोक्षधाम गाठू ! ( यावर कोणीच कांहीं बोलत नाही असे पाहून ) अहो श्रेष्ठहो, अजूनही हा माझा विचार तुह्मांस रुचत नाहींना ? सर्वजण- नाही ! नाहीं ! अगदीं नाहीं ! शांतं पापं ! शांतं पापं ! मुद्गलाचर्च- तर मग श्रेष्ठहो, हा असा वाद घालीत बसयापेक्ष आपण हरिणीची पूजा करून, तिच्या गुंडेत पुष्प माला देऊन, तिला सर्व पंचक्रोशीत हिंडचं; ती हत्तीण श्रीकाशीविश्वेश्वरांच्या प्रेरणेने ज्या श्रेष्ठाच्या गळ्यांत ती पुष्पमाला वालील, त्या श्रेठास या पूजासनावर वसवून, त्यासच अग्रपूजेचा मान देऊ ! म्हणजे हा वाद आपोआपच मिटेल ! | विरेश्वर दीक्षित- योग्य ! योग्य ! का शास्त्रीबुवा, आचार्याचा हा विचार सर्वोत्कृष्ट आहे, नाही ? आतां आचार्यांना कोण वरें नांव ठेवणार आहे ! बिंदुमाधव शास्त्री- आचार्यानीं तोड़ पण तेइ कादिली ! उत्तम ! फार उत्तम ! चला तर, राजदरवारी जाऊन, राजापासून हत्तीण मागून घेऊ. आणि मग तिच्या गुंडेंत पुष्पमाला देऊन, तिला या पंचक्रोशीत हिंडवीत आपण तिच्या मागे जाऊ ! झणजे श्रीविश्वेश्वरांच्या साक्षात्काराचा अद्भुत चमत्कार आप पाहण्यास मिळेल ! चला ! ( सर्व ब्राह्मण उटू लागतात तो पडदा पडतो.)