पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/18

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ श्रीज्ञानेश्वरमहाराज. द्धाच्या दिवशीं स्वर्गीतून खाली उतरून पाटावर जेवायला येऊन बसलेले पाहिले! सगळाच जक्का भुताटकीचा खेळ, नी तो जेव्हां श्रीपतभटांना खरा वाटला, तेव्हां आश्चर्यचे ! त्रिवेणी- ( गंगेची पूजा करीत असतां मध्येच थांबून ) जान्हवी, मेलेली माणसं स्वर्गातून आणली ही भुताटकी, नी ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या तोंडून वेद बोलविले, याला ग तू काय झणणार ? अग, देवाशिवाय कोणाच्या हातून बरं होणार आहेत असली अवटित कृत्यं ? . उत्तरा- ( धुण्याची पाटी भरीत असतां ) इश्श ! रेड्याच्या तोंडून वेद बोलविले नी श्राद्धाला मेलेली माणसं स्वर्गातून खाली आणली ह्मणूनच का त्यांना देव ह्मणायचं ? अहा ग खुळे ! अग, मसणवटांतले वेताळ, खवीस, समंध, ब्रह्मराक्षस, जाखाईजोखाई, यांची आराधना करून वीरमांत्रिक नी चेटकाळ्या थोडे का चमत्कार करून दाखवितात ? त्यांतलेच मेले हे! ती राधी चेटकीण नव्हती का मागं इथे ? तिचं या क्षेत्रांत केवढे प्रस्थ माजलं होतं, ते पाहिलं होतंसना ? तिनं तुझ्याच जावेचं मूल, नव्हतं का पिंपळाच्या झाडावर नेऊन ठेवलं ? एक कीं दोन, क्षेत्रांत तिनं सगळ्यांना त्राहि त्राहि करून सोडलं होतं ! पण अखेर दादंभटांनी तिची चांगली मोडशी जिरविली ! तसं. हवं या मेल्यांना करायला ! दादंभट या वेळी जिवंत असते तर.. त्यांनी बरीक त्या राधीसारखीच यांची कणीक चांगली मऊ केली असती समजलीस ! जान्हवी- ( धुण्याची पाटी कमरेवरून उतरुन ठेवून ) मेला ढोपरा एवढा पोर ! नी आपला व्यासपिठावर बसून पुराण सांगतो ! नी अर्धाअधिक गांव रोज लोटतो आहे, त्याच्या त्या पुराणाला ! आमच्या सासूबाईंच्याबरोबर, नाहीं ह्मणायला मी एक दिवस बसले होते हो त्याच्या त्या पुराणाला जाऊन. इश्श ! चलींत नेऊन घाला मेल्याचं तें पुराण ! नाहीं त्यांत रामराव णाची व कौरवपांडवांची लढाई, का कृष्णाची बाळलीला, की गों, रास, की द्रौपदीचं का सावित्रीचं आख्यान, कीं।