पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/180

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ श्रीज्ञानेश्वरमहाराज. असल, ह्मणजे आरडण्याओरड्यानं मेला विटाळचंडाळ तरी व्हायचा नाहीं ! अंबाबाई, अगदी या इथवेरी येइस्तवर किहो । देवानं चांगलं संभाळलं होतं ! पण इतक्यांत मेला गांवाबाहेरला एक धटिंगण, मी शिवशाल! शिवशील! ह्मणून ओरडता ओरडतां मला खेटून पु चालता झाला! पार्वती बाई, वाटावर निघाला असला तर इथूनच परता कशा बाई वरीं माघा-या ! पार्वती०- ह्म गजे ? आज हे मी नवलच ऐकते आहे बाई ! अंबा- अहो नवल कसलं ! हतिणीच्या सोंडेत फुलांची माळ देऊन तिळा सोडली होती ना मुद्गलाचार्यानीं पंचक्रोशीत ? तिनं किनई तो श्रष्ट पोरटा ज्ञानेश्वर का फानेश्वर आला आहे ना यात्रा करीत काल वाटावर, त्याच्या गळ्यांत ती फुलांची माळ वातली हो ! म्हणून त्या पोरट्याला पाहण्याकरिता, लोटली आहे सारी पंचक्रोशी घाटावर ! | पार्वतीय-इश्श ! होय का ? नी त्या भ्रष्टाला का यज्ञमंडपति घेऊन जाऊन मुद्गलाचार्य त्याची अग्रपूजा करणार ? उमा-बाई कलीच मातला ! मग हा भ्रष्ट कारटा काय ना कोण काय ! उद्यां गांवाबाहेरल्या म्हारोड्यांतल्या एकाद्या धटिंगणाची देखील पूजा होऊ लागेल बरं या क्षेत्रांत ? येतां येतां लोक बोलत होते ते मी ऐकलं हो, की या अंबाबाईचे यजमान, त्या हत्तिणीनं आपल्या गळ्यांत माळ घालावी ह्मणून, तिच्यापुढे शंभवेळां जाऊन उभे राहिले ह्मणून ! नी पार्वतीबाई, तुमच्या यजमानांनी देखील म्हणतात जिवाचा बरीच धडपड केली हो ! पण शेवटी त्या हात्तणीनं या सा-यांनाच एकीकडे ठेवून आपली त्या पोरट्याकडेच धाव घेतली ! | अं०- अहो उमाबाई, हत्तीण ती ! तिला माणसासारख कळतं का आहे ? अहो, बोलून चालून ते मुकं जनाबर ! तिला कसली लहानथोराची वा शुद्धाशुद्धाची पार्श्व ! यांनी मुळा है। असली निवड तिच्याकडे सोपवायचीच नव्हे ! अहो, म्हणतात ना, आधीं जाते वुद्ध नी मागून जातं मांडवल, तशांतली गत : ( इतक्यांत वाराणीकाक प्रवेश करतात. )