पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/181

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ॐ ५ . १७३ पार्वती- क काकू, बादावरुनच का आला ? वाराणशः -- . ही मी तिकडूनच येत आहे. ( सर्व नगः तिच्याजवळ जाऊ लगः न ) हे हे मला खेटू नका, दूर व्हा, कुत्र्याचा विटाळ झाला आहे हो मला! अहो आमच्या विंदुमाधव - शाक्यांच्याकडे तुमचे पुरु हैं असं असं झालं, आता पुढे कसे करायचं, म्हणून धापा टाकीत विचारायला आले हो ! तेव्ह, ते दोघेही वाईवाईनं वराबाहेर पडले ! मी तुळशीला पाणी घालून नुक्तीच माळ ओढीत बसले होते! पण बाई हा विलक्षण प्रकार जेव्हा कानांनी ऐकला, तेव्हां कसची माळ नी कसची बीळ ! अर्वीच माळ सोडून उठले तुळशीपुढून, नी तशीच निवालें त्यांच्या मागोमाग ! अंबा०- मग, तुम्हांला समजला का कार पुढे काय प्रकार झाला तो ? त्या कारव्याच्या गळ्यांत हाचणीनं माळ घातली, इथवर कळलं आहे आझाला या उमाबाईच्या तोंडुन ! | उमाः- अहो काकू, मला पुष्कळ वाटलं कीं तसंच त्या गर्दीत अमळ पुढे होऊन, पहावं पुढं काय होतं तें ! पण वाई, पुरुषांची देखील जिथे त्रेधा उडाली, तसल्या गर्दीत आपली बायकांची कुठली डाळ शिजायला! असं मनांत आलं, ह्मणून मी बाई परतलें घरी मावारी ! काकू, तुमची गोष्ट वेगळी नी आमची वेगळी ! बरं आतां सांगा बरं, वाटावरचा प्रकार कुठवर आला आहे तो ? वाशी -- उमाबाई, आतां किनई वादावर सारं शुक झालं आहे ! चिटयांखलं देखील राहिलं नाहीं आता तिथे । सारी पंचकोशी आता विश्वेश्वरांच्या देवळाकडे लोटली आहे ! मी देवील तशीच परभारी विश्वेश्वरांच्या देवळाकडे जाणार होते. पण मेली ब्राह्मणशूद्रांच्या पागोट्यांची नी महारडोंबांच्या डोक्यावरच्या चिंधोव्यांची सगळ्या वाटभर पसरलेली गुतावळ तुडवून तुडवून, मला अगदी चिळस आली होती ! नी तितक्यांत मला कुत्रं शिवलं! तेव्हा असा विटाळ घेऊन कसं जावं देवळांत ? झणून दोन तांबे आंगावर ओतून घेण्याकरितां घराकडे वळलें !