पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/182

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ श्रीज्ञानेश्वरमहाराज. पार्वती०- म्हणजे ! हे सारे आतां देवळांत जाऊन काय करणार ? वाशी०- इश्श ! काय करणार म्हणजे ? नाहीं तर हा असा भ्रष्टाकार क्षेत्रांत माजु देऊन, उयां ब्राह्मणांनी महारडॉबांच्या पानांश पान लावून का गिळायला बसायचं आहे ? | अंबा ०- अहो काकू, ते सारं खरं ! पण क्षेत्रांतील शहाण्या ब्राह्मणांनांच अगोदर हात चावून अवलक्षण दाखविलं ! मग आतां हें कसं टळणार ? - वाराणशी०- हैं कसं हो अंबाबाई तुमचं उफराटं बोलणं ? हे असं होईल, हे कुणाला स्वप्न का पडलं होतं आधा ! पण आता याला तुमच्याच यजमानांनी कशी वाशी सुरेख तोड काढली आहे ! ते मुद्गलाचार्यांना ह्मणाले, हत्तीण झणजे काय ? ज्ञानहीन पशु ! त्या मुक्या जनावराला काय समजतं आहे ! म्हणून हातैणीनं माळ घातली, एवढ्याचकरिता या भ्रष्ट पोराला आम्ही अग्रपूजेचा मान कधीही देणार नाहीं ! आह्मांला अग्रपूजेकरितां असा । अधिकारी पुरुष हवा कीं, श्रीविश्वेश्वरांनी प्रत्यक्ष प्रगट होऊन, त्याच्या हातून यज्ञाचा पुरोडाश ग्रहण केला पाहिजे ! ०-हैं खरंच नव्हे का तर उमाबाई ? अहो हात्तिणीनं माळ घातली म्हणूनच का त्या पोरट्याला श्रेष्ठ ह्मणायचं ? वाशी - अंबाबाई, तुमच्या यजमानांच्या ह्या विचाराला सा-या क्षेत्रस्थांनी मान डोलविली ! नी सारे क्षेत्रस्थ त्या कारट्याच्या हातांत पुरोडाश देऊन, त्याला पुढं घालून, आता देवळाकडे गेले आहेत ! उहा- नी मेल्यांनो, तो भ्रष्ट पोरटा का आतां देवाच्या गाभा-यांत जाऊन देवाला विटाळ करणार ? बरं आहे ह्मणावं ! आमच्या विश्वेश्वरांचे सोवळे किती कडक आहे ते कुठे आहे तुला अजून ठाऊक ! वी देखलंस पण मेल्या बडगा कुठे पाहिला आहेस अजून ! गाभा-यांत ने पाय तर ठेव, ह्मणजे श्रीविश्वेश्वर हजारों भुंगे उत्पन्न करून, तुझ्या अंगाला इसरितील, ना तुझा डोंब करून सोडतील!