पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/183

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ५ वा. १७५ पार्वती- खरंच काकू, विश्वेश्वरांनी असाच काही तरी साक्षात्कार आज दाखविला तरच टळणार आहे माई हा भ्रष्टाकार ! नाहीं तर उद्या या क्षेत्रांत क्षणभर देखील रायाची सोय उरणार नाहीं ! | वाराणशी०- बाई, देवाला आपली पूर्ण काळजी आहे ! तेव्हां तो असा भ्रष्टाकार कां बरं होऊ देईल ? कधी होऊ द्यायचा नाहीं ! चला, आतां गंगेवरच आंगं धुवून सायाजणी देवदर्शनाला जाऊ ! | ( वाराणशीकाकूच्या मागून सर्व स्त्रिया निघून जातात. ) प्रवेश तिसरा. स्थल- काशीक्षेत्र-श्रीविश्वेश्वरांचे देवाय. | ( देवालयांत श्रीविश्वेश्वर,च्या अग्रभागी श्री ज्ञानेश्वरमहाराज उभे असून, ते नेत्र मिटून सद्ब्यानांत निनग्न झाले आहेत, त्यांचे शेजारी मुद्गलाचार्य हात जोडून उभे आहेत, ३ भोंवतीं दूर अंतरावर ब्राह्मणादि अठरापगड जातीचे लोक उभे आहेत, असा पडदा उघडतो. ) । | बिंदुमाधव-अहो आचार्य, असे एकसारखं तिष्ठत उभे राहून आमचे पाय आतां दुखायला लागले ! ६ ४ असा डोळे मिटून आणखी किती वेळ येथे उभा राहणार ? विरेश्वर- अहो शास्त्रीबुवा, या कांहीं तोंडव्या का गोष्टी आहेत ! अहो, ज्याचे अवसान त्याला माहीत ! अहो, हा रडत राऊत आचार्यांनीं उगीच मोट बांधन घोड्यावर बसविला आहे ! आणि दुसरे काय ? गोविंदलुवा०- दीक्षित, यथार्थ बोलला ! मला तर हा प्रसंग फारच कठीण दिसत आहे ! अहो, अशा जाताने देवालयाबाहेर उभे राहून लांबून कळसाला नमस्कार करून पुढे चालू व्हायचे एवढाच याचा अधिकार ! असे असून या जातिहीनाने