पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/185

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ५ वा । १७७ हा ध्यानस्थ झाला आहे ! बाकी याने असा येथेच राम म्हटला, तर डोंबाच्या लाथेने तरी याला मुक्ति मिटेल! त्रिलोचन्ह ७- अहो आचार्य, आह्मां सर्वाची अजून तरी एवढी प्रार्थना ऐका, कीं या भ्रष्टाचा हा अमंगल देह श्रीविश्वेश्वरांनी आपला तृतीय नेत्र उघडुन, भस्म करून टाकण्यापूर्वीच तुह्मी याला येथून घेऊन जाऊन, याच्या जातात याला नेऊन चाला ! नाहीं तर याच्या देहाची राखंडी झालेली पाहून, याचे सगेलोवती येथे येऊन गोंधळ करून सोडतील ! सुद्गलाचर्य- (ज्ञ नरमहाराजांस उद्देशून ) समर्थांचे ध्यान आटपलें ह्मणजे समर्थांनी गाभा-यांत चलावें ! । ज्ञानेश्वर-- अहो आचार्य, अहो श्रेष्ठहो, श्री सत्यानानंतर श्रीसद्गुरुनिवृत्तिनाथांत हा पहिला प्रणिपात घालून, हा दुसरा प्रणिपात मी तुझां श्रेष्ठांच्या चरणी घालीत आहे ! (श्र ज्ञानेश्वरमहाराज एकापुढे एक दे न नमस्कार घालतात. दुस-या नमस्काराच्या वेळेस सर्व ब्राह्मण आपले पाय मागे काढून घेतल्यासारखे दाखवितात. ) आणि हा तिसरा प्राणात मी श्रीपांडुरंगचरणीं अर्पण करीत आहे ! ( श्रीज्ञानेश्वरमहाराज तिसरा नमस्कार घालतात.) तरी अहो श्रेष्ठहो, तुमचा वरदहस्त माझ्या मस्तकीं। असावा, झणजे तुझां श्रेष्ठांच्या आशीर्वादाने ( सर्व बह्मण श्रीज्ञा नेश्वरमहाराजांचा धिक्कार करतात. ) आणि श्रीपंढरीनाथाच्या कृपेने तुह्मीं आशा करीत आहां, असले दिव्य तुझा श्रेष्ठांस करून दाखवण्याचे सामर्थ्य माझ्या आंगीं येईल ! ( सर्व ब्राह्मण श्रीज्ञानेश्वरमहाराजांचा पुन्हा धिक्कार करतात. श्रीज्ञानेश्वरमहाराज श्रीकाशीविश्वरांकडे तोंड करून, हात जोडुन, प्रार्थना करू लागतात. ) हे ब्रह्मानंद, पुराणपुरुषा, शिवस्वरूपा श्रीहरि, तुझा जयजयकार असो ! हे भक्तप्रियकरा, निरंजना, भालनेत्रा, तुझा जयजयकार असो ! हे मायातीता, कैलासनगविहारा, तुझा जयजयकार असो ! हे अविल जगत्पालको, असो । मंगलरत्नभांडारा, चंद्रशेखरा, तुला नमस्कार ( श्रीज्ञानेश्वरमहाराज नमस्कार घालतात. ) हे ऋतिसारसमुद्रा,