पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/186

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ श्रीज्ञानेश्वरमहाराज. अमूर्तमूर्ता, धर्मवर्धना, सदाशिवा, तुला नमस्कार असो ! { दुसरा नमस्कार घालतात. ) हे सकळ कल्याणदायका, योगभूषणा, गंगाधरा, तुला नमस्कार असो ! ( तिसरा नमस्कार घालतात. ) हे भवभयमांचका, ज्ञानवना, विश्वनाथा, कर्पूरगौरा, तुला नमस्कार असो ! ( चोथा नमस्कार घालतात. ) हे सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तमा, वेदप्रतिपाया, कारस्वरूपा, विश्वेश्वरा, तुला नमस्कार असो ! ( पांचवा नमस्कार घालतात व ह त जाऊन पुन्हा देवाची प्रार्थना करू लागतात. ) अहो भक्तकाजकैबारी शुलपाणी, तुमचे चरणी मी वारंवार नमस्कार घालीत आहे, तरी अहो दयाळा, यावेळी कैलासभुवन सोडून येथवर येऊन, हा पुरोङाश ग्रहण करावा, आणि या समर्थाची ही एवढी इच्छा तृप्त करून, आपल्या या दीन दासाला धन्य करावें ! अहो पंचदशनेत्रा, भवानीवरा, भगवंता, तुझी सकल विश्वाचा उद्धार करण्याकरितां, अश्विल भूमंडळात श्रेष्ठ अशा या वाराणसी क्षेत्र नित्य वास करीत आहां ! तेव्हा आपलें दर्शन घेऊन कृतार्थ व्हावे, मगन मा तीर्थयात्रा करीत आपले चरणापाशी धावून आले असतां, अहो जगदानंदकंदा, उमावरा, तुह्मी हरिणीच्या हृदयांत प्रेरणा करून, तिच्या करवीं या दीनदासाच्या गळ्यात ही पुष्पाला घालविली ! आणि या कलियुगी असंभाव्य असे हे दिव्य या श्रेष्ठांस करून दाखविण्याचा प्रसंग मजवर आणला ! अहो मायाचक्रचालका, श्रीहरि, यावरून मजसारख्या यःकश्चित् भक्ताच्या हातून हे दिव्य जगतास करून दाखवावे, अशी तुमची इच्छा दिसते ! आणि अशीच जर प्रभूची इच्ा असेल, तर यावेळी प्रभुनी प्रगट होऊन, ही आपली इच्छा परिपूर्ण करून घ्यावी ! आणि आपल्या स्वरूतीने या पापराला धन्य करावें ! अहो कृपानिधि, पूर्वयुगीं तुह्मा स्वभक्तांकरवी असली अनेक दिव्ये करून दाखवून, स्वभक्तांच यश मिरविले आहे ! तरी हरस्वरूपा श्रीहरि, यावेळी आपण या आपल्या दीन दासाकरितां धावून येऊन, या दासाचा लज्जा रक्षण करावी ! देवा, तुझ्यापाशीं लहान