पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/187

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ५ वा. १७९ थोर भाव नाहीं, जातिकुळाचा विचार तू मनांत आणीत नाहींस, ज्ञानी मूढ ही आवडनिवड तुझ्यापाशीं नाहीं, तू सकल शरणागतांचा सोयरा आणि स्वभक्तांचा पाठीराखा आहेस ! देवा, तेव्हा यावेळी माझ्या या अमंगल देहाकडे न पाहतां, माझा बर्ण माझी जात न पाहतां, माझी हाक ऐकून वैकुंठीहून धावून या ! देवा, मी मूढ आहे, हीनकुल आणि हीनभाग्य आहे; परंतु हे सकलभुवनपालका पांडुरंगा, कमलचक्रअंकुशवन्नचिन्हित तुझे सुंदर पदांबुज मी आपल्या हृदयी धरले आहेत ! आणि मुवीं सदां तुझे पवित्र नांव ठेविले आहे ! आणि अशा रितीने मी तुझे दास्यत्व पतकरिले आहे ! यासाठी माझ्या अनंतकोटि पापराशी किंवा माझे अनंत अपराध यावेळी मनांत न आणतां माझी प्रार्थना मान्य करावी ! हे अनाथनाथा माधवा, ( ब्राह्मणांकडे बोट दाखवून ) हे श्रेष्ठ तुजडूनही थोर असून, या श्रेष्ठांचे सामर्थ्य तुजहूनही अधिक आहे ! कारण देवा, या श्रेष्ठांनी पूर्वयुगीं यादवकुळ भस्म केले, शुक्राची संपत्ति सागरांत नेऊन लोटली, परीक्षितराजाला निमिषार्धात भस्म केला, नृगराजाला सरड केला, अत्रिनंदनाला क्षयरोगी केला, कार्यनंदनाला दासीपुत्र केला, कुबेराला वृक्ष केला, आणि देवा, तुलाही अंबरीषाचे जन्माला घातले? असा या ब्रह्मश्रेष्ठांच्या सामथ्र्याचा अतुल प्रताप आहे ! परंतु सर्व गुणांमध्ये आपल्याला मुलाने जिंकावे, ही जशी बापाला हौस असते, त्याप्रमाणे या श्रेष्ठांनी यावेळी मला अज्ञ बालकाला पुढे करून, मजलारच्या तुझ्या दीनदासाचे, देवा, कौतुक मांडले आहे ! तरी अहो विश्वेश्वरा, आतां विलंब न करता प्रकट होऊन हा पुरोडाश ग्रहण करावा ! ( हे शेवटचे भाषण बोलता बोलतां श्रीज्ञानेश्वरमहाराज गाभा-यांत प्रवेश करतात. इतक्यांत चहूकडे दिव्य प्रकाश पडून, पिंडीतून श्रीविश्वेश्वर आपला हात बाहेर काढून, श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे हातांतून पुरोडाश उचलून घेतात. श्रीज्ञानेश्वरमहाराज गाभा-याबाहेर येऊन श्रीविश्वेश्वरांच्या पुढे दंडासारखें पडून श्रीविश्वेश्वरांस नमस्कार घालतात. तो ग्रहण करून श्रीविश्वेश्वर