पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/189

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ॐक ५ वा. १८१ आपली अंतःकरणपू भमि पश्चात्ताप अमीनें जाळून शुद्ध केली आहे, तरी अहो कृपासिंधु, या भूमींत भगवंताचे प्रेमरसबीज पेरून त्यावर आपल्या उपदेशजलाचे सिंचन करा. ह्मणजे आपण लाविलेल्या बिजाच्या वृक्षसावलीत आनी जन्मभर सुखाने राहून अंतकाळानंतर प्रभूच्या मोक्षधामी निरतंर वास करू ! मुलाचार्य- अहो सरुथा, तुह्मासारख्या जगद्गुरूवांचून आह्मांला आत्मज्ञान कधीही प्राप्त होणार नाहीं; आणि आत्मज्ञानावांचून आमची कल्पांतीही सुटका होणार नाहीं ! अहो समर्था, आत्मज्ञानाकरितां श्रीरामचंद्र प्रभूना वसिष्ठाचे चरण धरावे लागले, ब्रह्मसनातन श्रीकृष्ण अनन्यभावें सांदीपनीला शरण गेले, व्यास नारदांच्या पायीं लागले, इंद्राने बृहस्पतीचे पाय धरले, उमः श्रीशंकरांना शरण गेली; तात्पर्य, अहो श्रेष्ठ, नेत्री अंजन घातल्याशिवाय भूमिगत द्रव्य दिसणे जसे कठीण, त्याप्रमाणे आपल्यासारख्या जगङ्गुरुंना शरण गेल्यावांचून आह्मांला यथार्थज्ञान कथाँही होणार नाही. ह्मणुन आह्मीं गुरुपदमकरंद सेवन करण्याकरितां भ्रमर होऊन गुरुचरणीं ठाव मागत आहों. तरी अहो दयाळा, आमच्यावर कृपा करून आह्मांला उपदेशामृत पाजावं, पंचवीस तत्वांच्या मेळांत आह्मीं बहुत काल सांपडलों आहों, त्यांतून आह्मांला मुक्त करावे आणि पंचभूतांची झाडणी करून आह्मांला सावध करावें ! ज्ञानेश्वर- अहो सुजनहो, तुह्मांसारख्या श्रेष्ठांना मी सांगावें असा माझा अधिकार नाहीं ! पण तुह्मीं विचारीतच आहां ह्मणून तुह्मांला माझे हेच सांगणे आहे कीं, श्रीशंकर, श्रीरामचंद्र, सूर्य, चंद्र, महेंद्र कुबेर, वृहस्पति, वरुण, यमधर्म, अमि, वेद, गायत्री, भागीरथी, अश्वत्थ, अंबिका, लक्ष्मी, सरस्वती, इत्यादि अनंत देवदेवी भिन्न भिन्न आहेत हा मिथ्या भेदभाव मनांतून दूर लोटा; आणि अनंत ब्रह्मांडे निर्माण करून त्यांची सूत्रे चालविणा-या भगवंताच्याच या अनंत विभूति आहेत. इतकेच नाही, तर तो आत्माराम अखिल प्राणिमात्रांच्या हृदयांत सदैव नांदत आहे; तात्पर्य, हे चराचर सर्व भगवद्रूपी आहे, हे १६