पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/19

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ ७ अक १ ला. हरिश्चंद्र राजाची कथा, की नेमधर्माच्या का उपासतापासांच्या गोष्टी ! देह अमुक आहे, कर्म तमुक आहे, नी जग मिथ्या आहे, याच सगळ्या मेल्या देहाच्या नी कर्माच्या गोष्टी ! मग पुरुषांना त्यांत काय जलं गोड लागत असेल ते त्यांचं त्यांनाच ठाऊक ! अग, आतांशीं देवळांतले पुराणीक नी हरदास, हे देखील देवळांत येईनासे झाले आहेत पुराण सांगायला नी कथा करायला ! जो उठला, तो सुटला मेला त्या पुराणाकडे धावत ! खरंच, अशी नव्हती वाई कधी आजवर तन्हा पाहिली !! | मैळा-( तांदुळाची दुरडी निथळत धरून ) आमच्या घरीं बारा नी बारा चोवीस वर्स वेंचून चांगलं सहा शास्त्रांचे नी चार वेदांचे अध्ययन केलं आहे ! काशीपासून रामेश्वरापर्यंत आहे का दुसरा कोणी यांच्या तोडीचा वैदिक ? हजारों कोसांवरून येत आहेत ना आमच्या घरी कित्येक विद्यार्थी वेदांचं नी शास्त्रांचं पठण करायला ? पण मला कालच कळलं हो, कीं यांनी, तो रेडा जेव्हां वेद ह्मणायला लागला, तेव्हां घरच्या पोथ्या तेथे उरापोटावर घेऊन जाऊन त्या शुद्ध करून घेतल्या ह्मणून ! झालं, थोरांनीच असं केलं, मग काय ? गणभट, धोंडभट, हरभट, नीं क्षेत्रांत दुसरे अर्धवट ब्राह्मण, काखेत पोथ्या मारून सुटले धावत पळत यांच्या मागं ! उत्तर-(धुण्याची पाटी भरल्यानंतर पदर सावरीत ) इतक्यानंच संपलं असतं, तर मला पतकरलं असतं बाई ! पण आमच्या घरीं आतांशी काय चाललं आहे ते ऐकलंस का ? अग, आज चार दिवस, हीं पेरटी झणजे वैकुंठांतले देवच खालीं उतरले आहेत विश्वाचा उद्धार करायला, अशीच आपली चालली आहे आमच्या घरी अहोरात्र घोकणी ! नी लोकांना देखील तसाच उपदेश करणं चाललं आहे बाई अतांशीं एकसारखं ! लोकांनी म्हटलंच कीं, हे जर देवाचे अवतार आहेत तर मग यांनी अशा भ्रष्टाच्या पोटी का जन्म घेतला ? तर त्यांना दुर्वासमुनि, वशिष्ठमुनि, गौतममुनि, व्यास, वाल्मीक, अगस्ति नी पांडव, यांचा दाखला देऊन, यांची कुळं चांगली