पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/190

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ श्रीज्ञानेश्वरमहाराज. ज्ञानाने ओळखा ! कारण हे ज्ञान सकल कर्माचे डोळे आहेत; तेव्हां है निर्मळ असले पाहिजेत ! यांच्या अभावी तुह्मीं भगवंताच्या या अनंत विभूतींचे जरी पूजन केलें, विधियुक्त नित्यनैमित्तिक कर्मे जरी यथासांग केली, यज्ञयागादिक केले, व्रते नेम पाळले, अग्निहोत्रादिक होमहवने दिली, शिवा दाढी काढून संन्यास ग्रहण केला, व्यासपीठावर बसून पुराणव्युत्पत्ति केली. स्पर्शास्पर्शाचा विटाळ पाळून शुचिर्भूत राहिलां, घोर तप चरलें, तीर्थयात्रा केल्या, ऋच, यजुस्, साम असे तिन्ही वेद पढला, मोठे शास्त्र शिकून इशग्रंथी झाली, विशाळबुद्धि चालवून विद्या, धन, कीर्ति आणि सामर्थ्य संपादिले, तरी या सकल कर्माचा भोक्ता जो भगवंत त्याची ओळख तुह्मांला नसल्यामुळे, षड्रस अन्नांत फिरणाच्या पळाप्रमाणे तुमची ही कर्माचरणाची यातायात व्यर्थ होय ! इतकंच नाही तर अज्ञानानें हीं कर्मे आचरून तुह्मीं पुण्यात्मक पापाची जोड संपादन करून, पुनर्जन्माची सामुग्री करून ठेवीत आहा ! कारण या पुण्यात्मक पापाने जरी तुह्मीं स्वर्गावर चढून गेला, आणि तेथे इंद्राच्यासारखे भोग भोगले, तरी संचित पुण्य क्षीण झाल्यावर पुन्हा तुझांला या लोकीं येऊन जन्ममृत्यूच्या येरझारा कराव्या लागतील ! सुजनहो, प्राणिमात्रांच्या भावनेची प्रवृत्ति जिकडे असते त्या भावनेप्रमाणे प्राण्यांची बरीवाईट कर्मे त्यांना फलद्रूप होतात, आणि ही सुखदुःखाची फळे भोगण्याकरितां पुन्हा पुन्हा जन्मास यावे लागते ! दगडाची प्राणप्रतिष्ठा करून इच्छित फल प्राप्त होईपर्यंत त्याची पूजाअर्चा करणे, त्याची आराधना करणे, त्याला नवस करणे, त्याला बळी अर्पण करणे, आणि फलप्राप्ति झाली कीं तो धडा ह्मणून त्याला फेकून देणे, हे घोर पाप नव्हे काय ? सुजनहो, मनांत फलेच्छा धरून परमेश्वराच्या भजना लागले असतां फलभेागाने प्राणिमात्रांच्या हृदयांत काम शिरता, आणि तो शिरला ह्मणजे त्याच्या संगतीने ज्ञानदीप मालवतो। आणि फलाशेने अंधत्व पावलेल्या दृष्टीस इहलोक आणि पर लोक दोन्हीही दिसेनासे होऊन, भगवान जवळ असताह