पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/191

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ५ वा. १८३ त्याला दिसेनासे होतात ! यासाठी सुजनहो, सकल कर्माचा, सकल पूजनाचा आणि सकल आराधनेचा भोका भगवंत आहे, हे जाणून तुह्मी जें जें कांहीं कराल, ते ते फलेच्छा सोडून भगवंताला अर्पण करा ! झणजे अग्निकुंडांत घातलेल्या बिजाला जसा कोंब येत नाही, त्याप्रमाणे अशा रीतीनें परमेश्वरास अर्पण केलेली तुमची कर्मे कधीही फलद्रूप होणार नाहीत ! आणि अशा रीतीनें भजन याजन करणे हाच भगवंताशी एकरूप होण्याचा सरळ आणि सुलभ मार्ग आहे ! याकरितां श्रीहरि सर्वत्र भरला आहे हे ज्ञानचक्षून ओळवून अनन्यगतिक चित्ताने प्रभला शरण जा. नेत्रांनी सर्वत्र भगवंताचेच रूप पहा. वाणीने भगवंताचेच नांव घ्या. कानांनी नित्य भगवंताचे गुणानुवाद ऐका. मनाने सदैव भगवंताचाच लोभ धरा. भगवंताची सेवा हेच भूषण सर्वांगीं धारण करा, आह्मी श्रीहरीचे अलंकार असा अभिमान सदैव हृदयी बाळगा. विषयांची अल विसरून भगवंताच्याच मुलीने भुलून जा. भगवंताच्याच प्रेमाने सप्रेम व्हा. आणि अशा रीतीने भगवंताच्याठायीं तुह्मी एकनिष्ठ भक्ति धरली, झणजे ज्या भगवंताचे यथार्थ वर्णन करतांना वेद नेति नेति ह्मणून मागे सरले, सनकादिकही ज्या प्रभूकरितां वेडे होऊन गेले, श्रीशंकरांनाही ज्या श्रीहरीचे पादतीर्थ मस्तकीं धारण केले, आणि लक्ष्मीही अभिमान सोडून, ज्या प्रभुचरणांची अखंड सेवा करू लागली, अशा त्या सर्वश्रेष्ठ प्रभुला तुझी मरणापूर्वीच मिळाल! एका भक्तीशिवाय दुस-या कोणत्याही उपायांनी श्रीहरि तुम्हांला सांपडणार नाही. इतकेच नाही तर भक्ताशिवाय जे जे उपाय तुह्मी कराल ते ते अपायच होतील! ह्मणून तुमची वेदज्ञता, तुमची शास्त्रज्ञता, तुमचे बुद्धिवैभव, तुमचे श्रेष्ठ व्यावहारिक ज्ञान, वर्णश्रेष्ठत्वाचा तुमचा अभिमान, आणि तुमचे तर्कवितर्क बाजूला सारून सर्व जग भगवद्रूपच आहे, अमें समजून त्याला नम्र व्हा. तुमचे सकल गुण भगवंतावरून ओवाळून टाका. तुह्मी आपल्या संपत्तिमदाची प्रभूवरून कुरवंडी करा. मी अमुक कर्म केले, मी कर्मकर्ता, हा अभिमान विसरून जा,