पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/192

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

= = १८४ श्रीज्ञानेश्वरमहाराज. आणि जें जें कांहीं कराल तें तें भक्तिपूर्वक भगवंताला अर्पण करा. देव भक्तीचा पाहुणा आहे; तो लहानथार म्हणत नाहीं; जातिकुळाचा लहानमोठेपणा तो ओळखीत नाहीं; क्षत्रिय असो, वैश्य असो, शुद्र असो, अत्यंज असो किंवा यांहूनही अत्यंत पापयोनीत जन्मलेला असो, पुरुष असो अथवा स्त्री असो, एवढेच नव्हे तर तो पशु का असेना, दगडासारखा मठ्ठ असो, वेद शिकलेला नसो, शास्त्र पढलेला नसो, कोणी कसाही असो, ज्याने • म्हणून भगवंताच्या प्रेमांत मनोभावाने बुडी दिली, तो कोणत्याही जातींत, कोणत्याही कुळांत आणि कोणत्याही बर्णात जन्मलेला असो, भगवंताच्या एकनिष्ठ सेवेनं, समुद्रांत जसे मिठाचे खडे मिळून जातात त्याप्रमाणे त्याच्या जातीवर, त्याच्या कुळावर आणि त्याच्या वर्णावर पाणी पडून, तो भगवंताच्या स्वरूप मिळून जातो ! अहो श्रेष्ठहो, हे मी आपल्या पदरचे सांगत नाही, तर भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेले हैं। भगवंतांचे प्रतिज्ञाबचन आहे ! यासाठीं, अहो सुजनहो, चित्ताचे सारे व्यवसाय सोडून प्रभूच्या कीर्तनरंगी रंगून जा, आणि प्रभूच्या नामसंकीर्तनाने आपलीं सकळ दुःखें दिगंतरी दवडून, सकळ विश्व निर्मल करून सोडा; झणजे श्रीहरि सदैव तुमच्याजवळ राहतील आणि देहत्यागानंतर तुह्मी प्रभूच्या आत्मस्वरूपाप्रत पावाल! सुजनहो, शेवटीं तुह्मां सर्वांस माझी हात जोडून अशी प्रार्थना आहे की, तुह्मी जन्मास आल्यासारखे एक वेळ तरी भूवैकुंठ पंढरीस जाऊन माझ्या पांडुरंगाला डोळे भरून पाहून कृतार्थ व्हा ! कारण बापतीर्थपंढरिभूवैकुंठमहीवरी ॥ भक्तापुंडलिकाचेद्वारी करकटावरीराहिला ॥ ध्रु० ॥ नव्हेआजिकालिचेयुगांअठ्ठाविसांचे ॥ सजनिद्धरितांसाचेंहामृत्युलोकुचिनव्हे । हाचिमानिनिद्धरुयेरुसांडविचारु ॥ जरितूंपाहासिपरात्परुतारितुंजारेपंढरिये ॥ १ ॥ काशीअयोध्याकांचिमथुरामायागोमात ॥ ऐसीतीर्थइत्यादिकेंआहेतीपरिसरिनपवतिपांडुरंगी । हाचिमानिरविश्वासुयेर