पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/195

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ५ वा. . ૨૮૭ रामकृष्णहरी ॥ मंत्रषडाक्षरीगाऊंप्रमें॥ ७॥ पढरीसीजाऊँभट्ठविठुराया ॥ येरकर्मवायलोदुंदुरी ॥ ८ ॥ अहो जगद्गुरु ज्ञानदेवा, तवपदमुद्राजेथेउमटती । तेथेमनोगतीजाऊंझी ॥९॥ ज्ञानराजावुझेस्वरूपअंतरीं ॥ राहोसदांदूरीजाऊंनको ॥ १० ॥ सर्वचराचरीदिसोतवमूर्ति ॥ तेणेहविश्रांतिआह्मांलागी ॥ ११ ॥ ( पडदा पडतो.) प्रवेश पांचवा. स्थळ-श्रीपंढरीक्षेत्र. ( श्रीपांडुरंगाचे देवालय. देवापुढे गोरा कुंभार, सावता माळा, नरहरि सोनार, कूर्मदास, सज्जन कसाई, वगैरे सर्व | उभे आहेत असा पडदा उघडतो. ) गोरा कुंभार- संतहो ! श्रीहरीने आपल्या त्रिशुल शिखरी उभी केलेली मोक्षपुरी काशी सोडल्यावर, आह्मी श्रीज्ञानेश्वरमहाराजांबरोबर मारवाडांतून, तेर आरणभेंडीच्या बाजूनें, या पंढरपुरीं आलो आणि पुन्हा जे दक्षिणेकडे निघालों, ते कृष्णातीरची सर्व तीर्थं करीत करीत विजापुराहून घटप्रभा, मलप्रभा, ऋष्यमूक पर्वत, किष्किंदा नगरी, तुंगभद्रा, कुमारतीर्थ इत्यादि पुण्यस्थाने पाहून श्रीव्यंकटेशाचे दर्शन घेतले; आणि तेथून श्रीशैलमल्लिकार्जुन, शिवकांची, विष्णुकांची, मदुरामीनाक्षी हीं पहात पहात सेतुबंध रामेश्वरी पोहोंचलों. तेथे श्रीरामेश्वरांना आह्मी भागीरथीच्या कावडी अर्पण केल्या; आणि तेथून ताम्रपर्णी, करवीर, विराटनगरी, अलंकापूर, देहू, हीं अवलोकन करून पुन्हा पंढरपुरी पांडुरंगाच्या भेटीला आलों. या गोष्टीलाआज इतके दिवस झाले तरी देखील या तीर्थयात्रेत श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीं,ज्या आपल्या सुबोध आणि गंभीर वाणीने ठिकठिकाणच्या मुमुक्षुजनांस