पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/196

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८ १८८ श्रीज्ञानेश्वरमहाराज. अद्य बोध केला, आत्मज्ञान कथन केले आणि भगवंताच्या भक्तिरहस्याचे निरूपण केले, त्या त्यांच्या गंभीर वाणीचा नाद आमच्या कानीं अद्यापि घुमत आहे ! आणि त्यांनी आपल्या अंगच्या ईश्वरीअंशाच्या ज्या अनेक लीला लोकांत प्रकट केल्या, त्या जमू काय आताच आमच्या नेत्रांपुढे घडत आहेत, असा भास आह्वाला सदैव होत आहे ! खरोखर अलंकापुरवासीजनांचे थोर भाग्य, ह्मणूनच तीर्थयात्रेहून परत आल्या दिवसापासून त्यांना श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या अपूर्व पुण्यप्रद दर्शनाचे सुख मिळत आहे! आणि त्यांच्या मुखांतून स्रवणाया बोधगंगेचे स्नान नित्य घडत आहे ! आणि आपण हतभागी ह्मणून आपल्याला हरिदनीं श्रीज्ञानेश्वरमहाराज, पांडुरंगाच्या भेटीस येतात तेव्हांच कायतो त्यांच्या दर्शनाचा आणि उपदेशाचा लाभ मिळत आहे ! तरी पण या कार्तिक शुद्ध एकादशीकरितां श्रीज्ञानेश्वर महाराज या खेपेस येथे आल्यापासून आज पूर्णिमेपर्यंत त्यांच्या वागमताचे पान आपणा सर्वांना जसे करण्यास मिळाले, तसे आकंठ पान आजपर्यंत आपल्याला कधीच करावयाला सांपडले नव्हतें ! अहो संतहो, ज्ञानरायाचें चरित्र हेही सकल पापविनाशी चंद्रभागा तीर्थच आहे ! तर श्रीज्ञानेश्वरमहाराज पुंडलिकाचे दर्शन घेऊन येईपर्यंत आपण त्यांच्या चरित्रतीर्थात स्नान करूं ! ( इतक्यांत नामदेव प्रवेश करतात. ) | नामदेव-अहो गोरोबा, माझ्या ज्ञानमाउलीच्या चरित्रतीर्थात स्नान करूनच आणि माझ्या ज्ञानरायाच्या अतक्र्य लाला आठवृनच दिवस कंठण्याचा प्रसंग आता आपल्याला आला आहे : कारण, श्रीपांडुरंगांनीं ( गहिवरून ) ज्ञानरायाच्या विनंतीवरून श्रीहरीनी आपल्या श्रेष्ठ पद्मावर वसविलेल्या अलंकापूर क्षेत्रा, आपणा सर्वांना बरोबर घेऊन जाऊन, तेथे ज्ञानरायाला येत्या कार्तिक वद्य त्रयोदशीस समाधिस्थ बसविण्याचे अभिवचन दिले आहे ! अहो संतहो, श्रीकेशीराजाचे जगी प्रकट झालेले है व्यक्त ज्ञानरूप इतक्यांतच समाधिस्थ होणार, ह्मणून मनाला अत्यंत हुरहुर वाटत आहे ! ( सर्व संत गहिवरून जातात.)