पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/197

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ५ वा. १८९ पांडुरंगा, सख्या ज्ञानदेवावांचून आह्मीं सर्व संतांनी येथे कसे रे रहावें, झणून मी विष्ठलराजांना पुसले, तेव्हां ते मला ह्मणाले, नाम्या, अरे, ज्ञानराजा तो मीच. माझे रूप, तेच ज्ञानराजाचे रूप. अरे, त्याच्यांत माझ्यांत दुजेपणा नाहीं. अरे, मी मौन धरून असाच विटेवर उभा राहिलों, तर या युगीं भवसागरांत बुडणाया असंख्य जीवांना वर काढून त्यांना मोक्षप्राप्तीचा उगम मार्ग कोणता, हे कोण दाखवून देणार ? ह्मणून मीच ज्ञानरूपानें . अवतार घेतला ! आता माझे अवताररुत्य संपलें, ह्मणून ज्ञानदेवाचे हे मदांश रूप मी आपल्या क्षेमस्थानी पुन्हा स्थापीत आहे ! तेव्हां हैं गुप्त रहस्य तू स्वतः ज्ञानाने ओळखून, ते सर्व संतांनाही सांग, आणि ज्या ज्या वेळी तुम्हांला ज्ञानरायाबद्दल खंती वाटेल, त्या त्या वेळी तुम्ही त्याचे ध्यान करीत जा, म्हणजे ज्ञानमूर्तीच्या व्यक्त रूपाने मी तुम्हांला दर्शन देत जाईन! संतहो, देवांनी हें ज्ञान मला सांगितलें खरें, परंतु माझ्या मनाला ज्ञानरायाच्या वियोगाचे थोर क्लेश वाटत आहेत ! . ( इतक्यांत श्रीज्ञानेश्वरमल्लराज, निवृत्तिनाथमहाराज, सेपानदेव आणि मुक्ताबाई प्रवेश करतात. सर्व संत त्यांचे चरणांवर डोकी ठेवितात. नामदेव श्रीज्ञानेश्वरमहाराजांना कडकडून भेटतात. श्रीज्ञानेश्वरमहाराज नामदेवांचे डोळे पुसून त्यांच्या पाठीवरून हात फिरवतात. श्रीज्ञानेश्वरमहाराज देवापुढे लोटांगण घालून, खालील अभंग झणत, देवाभोंवतीं चार प्रदक्षिणा घालतात. तेव्हां सोपानदेव व मुक्ताबाई देवापुढे लोटांगण घालतात. श्रीनिवृत्तिनाथ व सर्व संत देवापुढे हात जोडून उभे राहतात. ) ज्ञानेश्वररूपपाहातांलोचनीं ॥ सुखजालेंवोसाजणी ॥ १।। तोहाविट्टलबरवा ॥ तोहामाधवबरवा ॥ ध्रु० ॥ बहुतासुकृतांचीजोडी । ह्मणौनिविठ्ठलीआवडी ॥२।। सर्वसुखाचेआगरु ॥ बापरखुमादेविवरु ॥ ३ ॥ ( चार प्रदक्षिणा संपल्यावर )