पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/20

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीज्ञानेश्वरमहाराज. होती असं कोणच्या शाखांत सांगितलं आहे ? असं चाललं आहे सान्यांना अडवणं ! नी गांवांतले सारे वैदिक, शास्त्री ना पुराणीक गोळा करून या मेल्यांना शुद्धिपत्र द्यायचं आहे ना कायसंसं ? त्याची चालली आहे हा आमच्या घरी तयारी ! अग शहाणीच माणसं जर अशी वेडांत शिरली तर त्यांना वेडं तरी कुणी म्हणायचं आतां ? | त्रिवेणी-(पूजा आटपून उठून) उत्तरे, तू आतां घरच्या यजमानांनासुद्धा वेडे ठरवायला लागलीस, तेव्हा शर्थच झालीं ह्मणायची बाई तुझ्या शहाणपणापुढे ! इतके दिवस कथापुराणं ऐकलींस, ती गेला वाटतं सारी चूलखंडांत ? रामाला पाहून जसे त्या मंथरेच्या अंगांत कलीचं वारं शिरलं होतं, तसं कुठलं शिरलं बाई तुझ्या अंगांत जलं हे असलं वेडं वारं ? अग तू त्या सत्पुरुषांची किती निंदा केलीस, त्यांना किती शिव्या दिल्यास, नाहीतर उद्या एखादा धोंडा उचलून त्यांच्या डोक्यात घातलास, तरी किनई त्यांना त्याचं कांहीं वाटायचं नाहीं ! उलट तुझं तोंड नी हात मात्र दुवून येतील ! ९ वल्लरी- (पाण्याची घागर क गरेवर ठेवून) अग तू जर आपली या सूर्यनारायणावर भुंकायला लागलीस, तर तू माझ्यावर भुंकू नको ' असं तुला म्हणायला तो थोडाच येणार आहे आभाळांतून खालती ! उलट तुझीच थुकी तुझ्या तोंडावर पडून लोक तुला हसतील! तसेच हे सत्पुरुष असतात बरं ! यांना कोणी निंदा की वंदा; ते तुम्हांला “ निंदू नका ? म्हणून म्हणायला यायचे नाहीत, की 'वंदा । म्हणून सांगायला यायचे नाहींत ! तुम्हीं त्यांना निंदलंत तर तुह्मांला पातक लागेल, नी बंदलंत तर तुह्मांला पुण्य लागेल ! पण बाई, हे माझं सागणं, तुम्हांला नाहींच रुचायचं म्हणा ! त्रिवेणी, चल बाई, आपण देवाचं दर्शन घेऊन जाऊं कशा आपल्या घरीं ! | त्रिवेणी-( निघून जातां जातां ) अहो उत्तराबाई, जान्हवी बाई नी उर्मिळाबाई, आलंच तुमच्या मनाला तर या बाई सोडून ही अशी साधुसंतांची निंदा करणं ! नी त्यांना शरण जाऊन