पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/202

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४ श्रीज्ञानेश्वरमहाराज. टले आहेत ! अहो ब्रह्मांडाधिपति पंढरीनाथा, श्रीमत्परमहंस श्रीपादरामानंदस्वामी यांच्या हातून, तुमच्या सुंदर कंठांतील हो दिव्य तुळसीकाठमाला माझ्या गळ्यांत वालवून, अहों जगन्नाथ विठ्ठला, तुमच्या भक्तीचा थोर माहिमा सकल विश्वाल सांगण्याविषयी तुम्ही मला अनुज्ञा केली, आणि अशा रितीने देवा, अनंत युगींच्या तुमच्या लीला माझ्या मुखाने गाववून माझे यश तुम्हीं अखिल भूमंडळीं गाजविले, आणि मला त्रिलोक धन्य केलें ! देवा, तुमच्या या अपार भक्तवत्सलतेचा महिमा में कोठवर वर्णन करूं ! अहो सकल देवाधिदेवा, तुम्ही मला साहा य्य झाला म्हणूनच तुमच्या अनुज्ञेप्रमाणे तुमची अल्प सेवा या ज्ञानदेवाच्या हातून घडली! अहो आदिनारायणा, तुमचे नामद्वमीं नित्य गाइल्याने माझी सकल कार्यसद्धि झाली! आणि तुमचे पादकमल मीं अखंड हृदयीं धरल्यामुळे माझ्या देहाल साक्षात् पुरुषोत्तम स्वरूप प्राप्त झाले ! अहो अनंता, मला आत भुक्ति, मुक्त किंवा सायुज्यता, यांपैकी कशाचाही चाड उरली नाहीं ! अहो माधवा, मीतूपणा वेगळ्या अशा तुमच्या निश्चल रूपाचे मला चिन्मयपणे अखंड ध्यान घडावे, आणि पृथक्लपणा सोडून तुमच्या स्वरूप ऐक्य होऊन कल्पांतवाः अमरत्वाने तुमचे शांत चित्ताने पादसेवन करीत बसावे, एवढाच काय तो माझा हेतु आतां उरला आहे ! आणि अहो भगवंता, है माझा हेतु परिपूर्ण व्हावा ह्मणून मी तुह्मांपाशी ज्ञानसमाधिसुखा अखेरचे मागणे पदर पसरून मागितले आहे. आणि अहो दीन दयाळ वासुदेवा, तुझी कृपाळू होऊन समाधि देण्याचा अनुग्रः करण्याचे कबूल केलें आहे ! तेव्हां अहो पांडुरंगा, मा तीन वर्षांपूर्वी जसे तुह्मीं मला चाळविले होते, तसे यावे पुन्हा मला चाळवू नका, हीच काकुळतास येऊन अहो प्रभो, ' तुह्मांला वरचेवर प्रार्थना करीत आहे ! अहो पुंडलीक वरदा पाँ रंगा, तुमच्या भिडेस्तव मी हा कालपर्यंत बहुत जनउपाधि सोर ली ! आणि तुमच्या निश्चल ध्यानसुखास पारखा झालों ! प अहो नरहरि, आतां नका बरे पुन्हा मला अशी गळ घालं! गोपा