पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/203

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ५ वा. १९५ कृष्णा, तुह्मीं कबूल केल्याप्रमाणे रुक्मिणी मातोश्रींना, तुम-: च्या पूर्वयुगींच्या सकल भक्तांना आणि माझ्या या सर्व संतबंधूना । बरोबर घेऊन, अलंकापुरीस. या, आणि या आपल्या दासाला वद्य । त्रयोदशीस समाधिस्थ बसवून याला कृतार्थ करा ! अहो नारायणा, मातोश्रीबाबांच्यामागे आह्मां चौघां. पोरक्या भावंडांचा तुह्मीं जसा आजवर.. अपत्यस्नेहाने सांभाळ केला, तशीच अहो. भगवंता, आह्मां चौघांभांवडांची.. अखेरीची निरवानिरव करणे तुमच्याकडेच आहे! यासाठी अहो गोविंदा, तुह्मी आपल्या वचनाप्रमाणे माझ्या निवृत्तिनाथ सद्रूंना त्र्यंबकेश्वरी घेऊन जाऊन, कुशावर्त. तीर्थी जलसमाधि देण्यास विसरू नका बरे ! आणि माझ्या सोपानाला कहेच्या तीरीं वत्सरग्रामीं. दिव्य भूमींत अखंड समाधिसुख या बरें ! अहो बापा पांडुरंगा, माझ्या मुक्ताबाईला मी तुमच्या आणि रुक्मिणी मातोश्रीच्या ओटींत घालीत आहे, तरी हिला तुमचे चरणांजवळ ठाब देऊन, आकल्प हिच्या हातून सेवा ग्रहण करा ! अहो सāधो 'नामदेवा, तुह्मांपाशीं या ज्ञानदेवाचे अखेरचे एवढेच मागणे आहे की, तुह्मी या माझ्या सकलसंतबंधुवर्गासह आतांच प्रस्थान करून मजबरोबर अलंकापुरीस चला, आणि तुह्मीं सर्वांनी आपल्या हातांनी या ज्ञानदेवालाः समाधि देऊन याला धन्य करा ! अहो पंढरीनाथा, तुमच्या कृपेने माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत. तेव्हां आतां तुमच्यापाशीं मला मागावयाचे असे कांहींच उरले नाहीं ! है। रुक्मिणीवरा पांडुरंगा, आता शेवटीं, जन्मादारभ्य जें जें कर्म माझ्या हातून घडलें, जो जो धर्म मी आचरिला, जी, जी तुमची सेवा केली, तुमचे गुणानुवाद गातां गातां जी जी पदपदांतरें मीं चलीं, तुमच्या आज्ञेप्रमाणे तुमचे भाक्तिमहात्म्य स्पष्टपणे उकलून सांगण्याकरितां जी जीं कांहीं अक्षरे मी लिहिलीं, वैकुंठभांडार श्रीमद्भगवद्गीतेचा प्राकृत जनांकरितां जो स्पष्टार्थ केला, स्वानुभवाचे द्योतक ह्मणून जे चार शब्द मीं लिहिले, ती ती सर्व मी तुमच्या चरणी अर्पण करीत आहे !