पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/205

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ५ वा. १९७ वतामाळी, कूर्मदास, सज्जनकसाई, रोहिदास, नरहरिसोनार, भानुदास, चोखामेळा, कन्हूपाठक, इत्यादि वैष्णवसंत हातांत पताका, टाळ, मृदंग घेऊन भजन करीत प्रवेश करतात.) नामदेव आतांपांडुरंगस्मरा ॥ जन्ममृत्युचुकवाफेरा ॥१॥ ऐसाकांहींकरानेम ॥ मुखस्मरारामनाम ॥ २॥ चिंताऐसेध्यान ॥ तेणेहोईलसमाधान।। ३॥ नामाह्मणेहारदास ॥ न्यासीअसावअिभ्यसि ॥ ४ ॥ (भजन चालले असतां श्रीनिवृत्तिनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई श्रीज्ञानेश्वरमहाराजांस हात धरून प्रवेश करतात, सर्व संत श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे पूजन करितात व त्यांस गंधाक्षता व कपूर चंदनाचे टिळे लावून रचे कपाळ केशरीगंध लावितात व त्यांचे गळ्यांत सुगंध पुष्पाचे व तुळशीचे हार घालितात. ) ज्ञानेश्वरपूर्वजन्मींसुकृतेथोरकेलीं ॥ तेमजआजिफळासिआलीं । ॥ १ ॥ परमानंदुआाजिमानसीं ॥ भेटीजालीयासंतासी । ॥ ध्रु०॥ मायबापबंधुसखेसोयरे ॥ यातेंभेटावयामननधरे ॥२॥ एकएकातीर्थीहूनिआगळे ॥ तयामाजिपरब्रह्मसांवळे ॥ ३ ॥ निर्धनासिधनलाभुजाला ॥ जैसाअचेतनप्राणप्रगटला ॥ ४ ॥ वत्सविघडालियाघेलुभेटली ॥ जैसीकुरंगिणीपाडसमीनली ॥ ५॥ हेपियुष्यापरतेंगोडवाटत ।। पंढरिरायाचेभन्नभेटत ॥ ६॥ बापः । रखुमादेविवरविठ्ठले ॥ संतभेटतभवदुःखफीटलें ॥ ७ ॥ अहो वैष्णव संतहो, तुम्ही सर्वांनीं । श्रीपांडुरंगाबरोबर येथवर येऊन मला शेवटचे दर्शन दिले, आणि वय अष्टमीपासून आज त्रयोदशीपर्यंत हा समाधिउत्सव पूर्ण केला, तेणेकरून मी धन्य झालों! (श्रीनिवृत्तिनाथमहाराज, सोपानदेव, मुक्ताबाई व नामदेवादि संत श्रीज्ञानेश्वरमहाराज समाधिस्थ होणार असणून विव्हळ होतात. तेव्हा श्रीज्ञानेश्वरमहाराज मुक्ताबाईस व सोपानदेवास पोटा धरून)