पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/206

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ श्रीज्ञानेश्वरमहाराज. तात व रुक्मिणी मातोश्री तुमचा प्रतिपाळ करतील. बाळांनो, तुह्मी माझ्या पांडुरंगाचे अनन्यभावाने चिंतन करा; ह्मणजे तुह्मांला कशाचेही भय उरणार नाहीं. अहो त्रिभुवनपालका पंढरीनाथा, माझ्या श्रीसदुरुनिवृत्तिनाथांचा, सोपानबाळाचा आणि मुक्ताबाबाईचा सांभाळ करणे तुमच्याकडेच आहे. देवा, यांची काळजी तुह्मांलाच केली पाहिजे. तुह्मावांचून आतां यांना कोणाचाही आधार नाहीं. तर अहो देवाधिदेवा, यांच्यावर आपली सदैव कृपा अस्वं या; आणि आजपर्यंत जसा मजवर लोभ ठेविला, तसाच लोभ यांच्यावर ठेवून यांचा सांभाळ करा. हेच तुमच्या पायांपाशी माझे शेवटचे मागणे आहे. ( नामदेवास मिठी मारून ) श्रेष्ठ नामदेवा, तू आपल्या मनास असे क्लेश होऊ देणे बरोबर नाहीं ! तुम्ही सर्वांनी आपले मनास विवेकाचे आळे घालून आणि श्रीपांडुरंगाचे सोज्वळ स्वरूप ध्यानी आणून आपलें समाधान करून घेतले पाहिजे ! अहो अलंकापुरवासी सुजनहो, मी आज बहुत दिवस तुमच्या गांवी होतो. तुम्हीं अपत्यवंताना आह्मां चौवां भावंडांचा प्रेमाने सांभाळ करून आमचा योगक्षम चालविला ! तुमच्यासारखे आईबाप आह्मांला त्रिभुवनांतही मिळणार नाहीत ! तुमच्या प्रेमाचा मला नित्य आठव होईल ! आतां मी आपल्या गांवी जातों ! तरी माझे स्मरण अस्त्रं द्या ! मजवर कृपालोभ ठेवा ! अहो सकलसुजनहो, येथून जाण्यापूर्वी मी आपल्या जीवींची अनुभवरखूण तुह्मांला सांगतों. मी सांगता हा राजमार्ग सवांहून श्रेष्ठ आहे ! ही माझी खूण तुम्ही भाक्तभावाने आपल्या जिवाशीं जतन करा आणि त्याप्रमाणे वागून जन्ममरणाचा फेरा चुकवा ! माझ्या विठोबारायाचे हे दीनवत्सल आपपरभावराहत भक्त, तुह्मां सकल ममक्षु चातक ना अखङ जलधारा देणारे स्वानंदसुखाचे मेव आहेत ! हे श्रवणामृताच कुंभ, हे कीर्तनाचे स्वयंभू पर्वत, हीं शांतिभूमीचीं निधार्ने, हा चातुर्यार्णवींची रत्ने, हे वैराग्यअंबरींचे दिनकर, हे अक्षय्यविज्ञा