पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/207

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ५ वा. १९९ अहो सुजनहो, तुम्हांला हा भवसिंधु पार उतरून नेण्याकारतां श्रीपांडुरंगाने ही थोर जहाजें निर्माण केली आहेत ! आणि या जहाजांवर भाक्ताशडे फडकत आहेत ! तरी या जहाजांत बसून, हरिनामाचा गजर करीत, सच्चिदानंद प्रभूच्या अविनाशी पदाप्रत जा ! तुह्मांला पैलतीराला नेण्याकारतां श्रीपंढरीनाथ नावाडी होऊन उभा आहे ! तरी मनांतील संकल्पविकल्प दूर लोटून, या संतांची सदैव संगत धरा ! यांच्यावर विश्वास ठेवा ! मनोभावाने यांना शरण जा ! ह्मणजे हे तुह्मांला भगवत्पदाची जोड मिळवून देतील! या संतश्रेष्ठांची थोरवी शिवब्रह्मादिकांनाही वर्णन करतां येत नाहीं ! तेथे यांच्या दासांचा दास जो मी, त्या म्यां यांची कोठवर स्तुति करावी ! कृतयुगांत सकल प्राणिमात्र परमेश्वरध्यानाने मोक्षपदाप्रत गेले ! त्रेतायुगी जनांनी महामख करून वैकुंठभुवन गांठलें ! आणि द्वापारी सकल जीव भगवंताची राजोपचारांनीं पूजा करून प्रभुपदाप्रत गेले! परंतु या कलियुगांत परमेश्वराचे नामसंकीर्तन हेच अत्यंत सोपे असे मोक्षप्राप्तीचे श्रेष्ठ साधन तुह्मांकरितां करून ठेविलें आहे ! यासाठीं दृढ भक्तियुक्त अंतःकरणाने तुमचे अंतकाळींचे पाठिराखे, आणि परलोकींचे सखेसोयरे जे हे संतमहाराज, यांना शरण जाऊन अखंड रामकृष्णहरि या षडाक्षरी मंत्राचा पाठ करा ! आणि प्रेमानें हरिकीर्तन करा ! अहो माझे मायबाप संतहो, मी आतां समाधिस्थ बसतों. मी तुमचे दीन लेकरूं आहे ! माझ्या तोंडून चुकून कधीं अधिकउणें उत्तर गेले असल्यास त्याची तुम्ही मला क्षमा करा ! आणि मजवर अखंड लोभ ठेवा ! अहो वैकुंठवासी इंद्रादि देवांनो, चित्रसेनादि प्रमुख गंधर्वांनो, शुकाचार्यादि ब्रह्मऋषींनो, वाल्मिकादि महामुनींनो, श्रेष्ठ व्यासादि महत्प्रभावांनो, मार्कंडेयादि चिरंजीवांनो, श्रीदत्त गोरक्षनाथ गैनीनाथादि गुरु आणि परम गुरूंनो, नारदादि भक्तश्रेष्ठांनो, दक्षादि भक्तराजांनो, लक्ष्मी पार्वती मातोश्रींनो, राधा रुक्मिणी गोपिकांनो, मेनकादि अप्सरांनो, लोपामुद्रादि ऋषिपल्यांनो आणि अहो पितृगणहो, तुह्मीं सर्वांनीं, या तुमच्या