पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/208

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०० श्रीज्ञानेश्वरमहाराज. वैकुंठ सोडून विमानांत बसून येथवर येऊन मला तुमचे शेवटचे दर्शन दिले, तेणेकरून मी धन्य झालों ! तुह्मां सर्वांना मी साष्टांग नमस्कार घालीत आहे; तरी तो ग्रहण करून मला तुमचा आशीर्वाद प्रसाद द्यावा ! ( स्वर्गातून पुष्पवृष्टि होते.) सुजनहो, मी आतां येतो; मजवर कृपा अस्वं द्या ! श्रीपांडुरंगा ! माझ्याठिकाणी तुमचे मन आहे; आणि तुमचे चरण माझे प्राण आहेत ! तरी माझा विसर पडू देऊ नका ! तुह्मी माझे मायबाप ह्मणून तुमच्या पादपद्मी कल्पांतपर्यंत मी वास घेत आहे ! श्रीसद्गुरु निवृत्तिनाथमहाराज, हा आपला अज्ञबाल ज्ञानदेव सद्भुरुचरणी अखेरचा प्रणिपात करीत आहे. (श्रीज्ञानेश्वरमहाराज श्रीनिवृत्तिनाथांचे चरणांवर मस्तक ठेवितात. ) तरी या अज्ञ बालकावर आपला वरदहस्त ठेवून, श्रीपंढरीनाथांनी माझा लळा पुरवून मजकरिता तयार करून ठेविलेल्या या समाधिशय्येवर मला नेऊन बसवा ! ( श्रीनिवृत्तिनाथमहाराज श्रीज्ञानेश्वरमहाराजारी हातीं धरून सिद्धासनाकडे घेऊन जातात. श्रीज्ञानेश्वरमहाराज सिद्धासनापुढे नमस्कार घालून नंतर सिद्सनाभोंवती चार प्रदक्षिणा घालू लागतात.) | नामदेव- अहो भाविक जनहो, या कलियुगांत सकल विश्वाचा उद्धार करण्याकारतां श्रीज्ञानेश्वररूपाने अवतरलेले हे वैकुंठाधिपति श्रीविष्णु, बावीस वर्षांत आपलें अवतार कृत्य आटपून निजधामास जात आहेत ! जड, मढ, खिया, बालक, शूद्र अत्यंत शुद्र, इत्यादिकांना हा भव पैलपार होता यावा ह्मणून, माझ्या ज्ञानरायाची ही समाधि श्रीपांडुरंगांनी जोपर्यंत क्षिातम आहे, जपर्यंत समुद्री जल आहे, जपर्यंत अंतरिक्षति वायु९ि आणि जोपर्यंत गगनीं चंद्र सूर्य तारे आहेत, तपर्यंत स्थिर ठेविली आहे ! तरी जनहो, माझा हा वाँच्छित फल देणारा आप दैन्य हरणारा ज्ञानराय हृदयीं नित्य आठवून याचे चिंतन करा ! खणजे तुम्ही धर्म, अर्थ, काम लाधून निश्चयाने हा भव तरून जाल ! माझ्या श्रीपांडुरंगाचे असे वचन आहे की, हा ज्ञानराज त्रैलोक्याची ज्ञानसंजीवनी असून अपमृत्यु हरण करणारा पराय