पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/209

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५T. २०१ सद्गुरु आहे! माझ्या ज्ञानरायाच्या समाधीकरित भगवंतांनी काशीप्रयागादिक्षेहूनही थोर आणि भूवैकुंठ पंढरीहूनही श्रेष्ठ असे हे अनादि शिवपीठ दिले असून, या ठिकाणी इंद्रायणी देवगगेंत जनपावनार्थ भूवरील सलतीर्थाना राहण्याविषयी आज्ञा केली आहे ! तरी या मोक्षपुरांत येऊन जे कोणी इंद्रायणींत स्नान करतील, श्रीसिद्धेश्वराचे पूजन करताल, माझ्या ज्ञानरायाचे दर्शन घेतील, माझ्या ज्ञानरायापुढे हरिकीर्तन करतील किंवा त्याचे चरित्र श्रवण करतील, आणि या अजानवृक्षाखालीं श्रीविठलनामाचे भजन करतील, ते भगवंताचे अंतरंग भक्त होऊन सकल गोत्रजसह अखंड सच्चिदानंदस्वरूप होतील! अहो वैष्णव संतहो, ही श्रीपांडुरंगाची वचनीकै तुझी सकल भाविक जर्नास सांगून, त्यांना जन्मास आल्यासारखें एकवार तरी या अलंकापुरीला येऊन माझ्या ज्ञानोबारायाचे दर्शन घेण्याविषयी उपदेश करा ! अहो संतहो, माझ्या सद्गुरु ज्ञानरायाची ज्ञानेश्वरी साक्षात् ज्ञानगंगा आहे ! या शानगंगेत तुम्ही आपलें अंतःकरण नित्य प्रक्षाळून, अंतःकरणावरील विपरीत कल्पनारूपी कलंक धून काढा! तुम्ही माझ्या ज्ञानरायाच्या अमृतानुभव-सुधेचा नित्य घोट घ्याल, तर तुमची काया ब्रह्मभूत होईल! वाशिष्टगतिचे मनन कराल तर तुमचे चित्तास अखंड समाधान प्राप्त होईल ! आणि माझ्या ज्ञानरायाचे पूर्ण भाक्तपर दिव्य अभंग मुखार्ने नित्य गाल तर जन्ममरणाच्या फे-यांतून मुक्त होऊन तुम्ही बैकुंठीं श्रीहरिसन्निध आकल्प वास कराल ! अहो संतहो, शेवटी तुमच्यापाशी हेच मागणे आहे की, देवांनीं तुम्हांला आज्ञापल्याप्रमाणे शुद्ध एकादशीस पंढरीस श्रीविठ्ठलाचे मुख पाहिल्यावर, कृष्णपक्ष हरिदिनी माझ्या ज्ञानोबारायाच्या भेटीस या अलंकापुरी येत जा. म्हणजे माझ्या ज्ञानरायाच्या नुसत्या दर्शनानेच तुम्ही ज्ञानी होऊन चतुभुजस्वरूपानें वैकुंठीं वास कराल ! ( इतक्यांत श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या प्रदक्षिणा आटोपतात. तेव्हां तीन वेळ समाधीपुढे नमस्कार घालून ते खालील अभंग अणत समार्चीत प्रवेश करतात. )