पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/21

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १ ला. व्या करून जन्माला आल्याचं सार्थक ! ( वल्लरी व त्रिवेणी देव ठाकडे जाऊ लागतात. ) उत्तरा- ( त्रिवेणीपुढे हात ओवाळून ) अललल ! आज हे एवढं ब्रम्हज्ञान कुठलं फुटलं आहे त्रिवेणाबाई तुम्हांला ? ( धुण्याचः पादों कमरेवर घेऊन व मोकळ्या हाताने उर्मिळेला व जान्हव:- ला वर कडे जाण्याकरितां ओढून ) आमचं काय मेलं म्हणा, पण तुह्मी बरीक घ्या हो या वाहत्या गंगेत हात धुवून, (जातां जानां) म्हणजे यजमानांचा अंगरोग नी चार पिढ्यांचं दळिद्र तरी नाहींसं होईल तुमच्या वरचं !! ( पडदा पडतो. } प्रवेश दुसरा. स्थळ- प्रतिष्ठान (पैठण) क्षेत्रांतील श्रीगोदातटाकाकडे जाणारा रस्ता. (पार्वतीबाई झांकलेले ताट हातात घेऊन प्रवेश करते. इतक्यत तिच्यामागून तिचा नवरा हरभट धावत येतो. ) हरभट- वा रे वा ! माझे घरदार लुटून ते त्या भामट्यांच्या पदरांत ओतायला जी तू तुरतुर निवालीस, ते मी आजच नाहीसा झालो असे समजून होय ? पण हा हरभट तुला विचारायला अजून जिवंत आहे बरं का ! चल, फीर आल्या वाटेने माघारी. बेशरम नाहीं तर ! म्हणे, या जन्मीं जर कोणाला कांहीं उचलून दिले तर पुढच्या जन्मीं देव आपल्याला तसेच देईल ! लोकांना उचलून द्यायला तुझ्या बापानें कांहीं शेपन्नास हजार दिलेच असतील या हरभटाला ? आण ते सारे इकडे ! ( पार्वती= बाईच्या हात’तील ताटावर झडप घालण्यास पुढे होतो. ) ।। पार्वती०- तर मग काय ? त्या सत्पुरुषांच्या दर्शनाला आज 1 देखील का मी रित्याच हातानं हात हालवीत जाऊँ ? इतकी | जल्ली प्रपंचाची हाव धरून, अखेर गांठीं काय बांधून जाणार