पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/22

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० श्रीज्ञानेश्वरमहाराज. आहांत, ते ईश्वराला ठाऊक ! मेल्यांनो, लोकांच्या बायकांनी त्या सत्पुरुषांच्यापुढे कितीक प्रकार नेऊन ठेविले ! कितीकांनी खणांनारळांनी सुवाष्णींच्या ओट्या भरल्या! कितीकींनी हळदकुंकू लुटवलं ! कितीकांनी कुंवारणींना बांगड्या भरल्या! कितीकींनी सौभाग्यवाणं वाटली! कितीकींनी ब्राह्मणभोजनं घातलीं । नी कितीकींनीं तर महिनाभर एकभुक्त राहून चांदीपितळेची ताटं नी वाट्या, पंचपक्वान्नांनी भरून ब्राम्हणांना दिल्या ! हरभट-हो, हो ! दिल्या तर ! दिल्या तर ! पार्वती०- हों ! हो ! म्हणून तोंड नको वेंगाडायला ! दिल्या, दिल्याच बरं ! जिला जे अनुकूल झालं, ते तिनं केलं. पण आपल्या घरी साया गोष्टींची अनुकूलता असून आजवेरी दिलं आहां का मला यातलं एक तरी कधीं करू ? एकभुक्त राहायचं, यांत तर नव्हतंना कांहीं वेचत ? पण ते देखील सदा मेहुणाचीं आमंत्रणं घेऊन मला घडू दिलंत नाहीं ! जलं, आपल्या हातून कांहीं होईना का कांहीं सुटेना, तर निदान दुस-याला / तरी आडकाठी करू नये ! हरभट- आडकाठी करू नये, तर मेहुणाची आमंत्रणे पस्तवून मी आपले नुकसान करून घेऊ होय ? आणि तुला दानधर्माला पैका देऊन घरादाराचा उन्हाळा करू होय ? मोठी शहाणीच कीं नाहीं तूं ! उद्या हातांत लोटा आला तर मलाच पुढे होऊन · विश्वेश्वरायनमः' म्हणत दः। घरें फिरावे लागेल ! या जन्मीं कण्या भाकरी खाऊन आणि उघडेनागडे हिंडून पुढच्या, जन्माची साठवण करणारे मूर्ख लोक, करोत त्यांना वाटेल तर स्वतःची नागवणूक ! ते तसे नाचले म्हणून मी नाहीं त्यांच्यासारखा नाचायचा ! म्हणे सत्पुरुष ! आणि आम्ही काय कमीच आहों वाटते ? | पार्वती०- कमी का जास्त, ते आपल्याच मनाला विचारायचं होतं ! दुस-याच्या तोंडून कशाला लावता वदवायला ? लौकिका साठी सकाळी उठून एकदां गंगेत बुचकळी मारली, नी घरीं । येऊन देवांच्या बोडक्यांवर पाणी ओतलं, म्हणजे नाहीं कांहीं