पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/23

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १ ला. ११ सत्पुरुषपणा आंगीं येत ! कधीं घटकाभर निवांत बसून देवाचं नांव घेत आहां का ? देवाकडे मुळीं लक्ष असेल तर किनई ? अहोरात्र जी प्रपंचाची विवंचना ! नी हें मिळव, ते मिळव, यासाठी सदा जिवाची धडपड ! आज कोणाच्या घरचं श्राद्धपक्षाचं आमंत्रण येत आहे, नी उद्या कोणाकडचं येईल, ही अहोरात्र घोकणी ! हरभ-हैं घर नाहीं; हा रस्ता आहे; याचे आहे का कांहीं तुला भान ? लोकांनी ऐकले तर काय म्हणतील ? पार्वती०- काय म्हणणार आहेत ? खरं आहे तेच बोलते आहे, असंच म्हणतील. नित्य लोकांकरिता सप्तशतीचे पाठ, नी देवावर रुद्राची आवर्तनं ! बरं, म्हणते लोकांकरितांच का होईना, पण ती तरी होत आहेत का, सोपस्कर, मनापासून नी भक्तीनं ? लोक थोडेच पाहायला येत आहेत आपण काय करता तें ? इकडून ‘ झालं सारं ' म्हटलं की, यजमानांना काय ? ते दक्षिणेचे धनी ! ती देऊन ते होतात मोकळे ! पण अशा फसवणुकीनं उलट आपल्याच माथी पाप लागतं, हें 5 कुं शास्त्रंराणं वाचून समजू नये, म्हणजे नवलंच म्हणायचं ! देवाची भीति जी अगदीच कशी नाहीशी झाली ती ? । हरभ- पण या उठाठेवी करण्याचे तुला काय कारण ? चुलीपुढे चालव तुझे काय असेल ते शहाणपण ! | छार्वती- कां वरं ? कां नकोत उठाठेवी ? मी नाहीं का अध्य पातकाची मालकीण ? लोकांना शास्त्र आपणच शिकवितां ना ? पण मेली पुराणांतली वांगी पुराणांत ! आजबेरी कानींकपाळी थोडी का आरडले ? अर्वअधिक आयुष्य गेलं असंच ! म्हणून हात जोडून सांगते की, जल्लं आतां तरी द्यावं हे सारं सोडून, नी ज्ञानेश्वरमहाराजांना शरण जाऊन, करून घ्यावं देहाचं सार्थक ! हरभ- आतां जीभ आवरतेस की नाही ?आमचे आह्मांला सारे कळते आहे ! तू नकोस मला शिकवायला ! पार्वती०- आपल्याला कळतंच आहे म्हणा! पण वळत नाहीं