पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/24

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ श्रीज्ञानेश्वरमहाराज. नाहीं असं भलतंच विचारायला ! ऐकलं का ? हे सत्पुरुष नी माझी मुक्ताबाई उन्हातान्हांत नी पावसांत तापत भिजत असतात, तर झटलं घरांत खंडीभर छत्र्या जमविल्या आहेत, त्यांतल्या चार छत्र्या द्याव्या त्यांना नेऊन ! चार छत्र्या घरांतून गेल्या तर त्या कांहीं अनाठायीं नाहीं लागायच्या ! चांगल्या सत्कारणींच लागतील ! नी तो पागोट्यांचा पर्वत ! जल्ला तो डोक्यावर बांधायला पाठीं का पोटीं कुण्णी नाही ! त्यांतल्या तीन घड्या होऊ देत ह्मटलं कमी- हो ह्मणून नाहीं येत तोंडातून ? हरभद- कां ? हो ह्मणून कां बरें यादें माझ्या तोंडून ? पार्वती०- खरंच ते ! दाराशी भिक्षेकरी आला तर त्याला चिमुटभर भिक्षा मिळेना ! कीं उष्टेखळीशी कुत्रं आलं तर त्याला कधीं उष्टं पान चाटायला मिळेना! तेव्हा इतका धीर नाहीच व्हायचा, हे उघडच दिसतं आहे मला ह्मणा ! पण आपला जीव वेडा, वाटलं एकदां जवळ सांगावं, ह्मणून सांगितलं झालं ! हरभट-तं लाख बडवडलीस तरी माझ्याकडून ह्मणून त्यांना एक छदाम देखील पोहोचायचा नाही समजलीस ! | पार्वती०- कशाला पोंचेल ? नाहींच पोंचायचा ! हे तरी कमत हवं ! कमतच जर नसेल तर बुद्धि तरी कोठून व्हायला ? मला पुष्कळ बुद्धि आहे ! पण काय उपयोग ? ( रडत रडत ) नाहीं माझी घरांतल्या काडीवर देखील सत्ता ! घालाल तें गिळावं नी द्याल ते नेसावं ! कसला जल्ला असला जन्म ! दारापुढची कुत्रीच आह्मी, नी दुसरं काय !! हरभट- रडून कांगाव करायची विद्या तुला फार चांगली साधली आहे, ते आहे मला ठाऊक ! हें बवा, आतां हा शहाणपणा पुरे करून फिरा मावाच्या घराकडे आणि घरी गेल्यावर आमच्या नांवानें बसा पोटभर रडत ! | पार्वती०- मग काय अर्ध्या वाटेतूनच का मी परत जाऊँ ? आपण जरी मान तोडलीत तरी मी ह्मणून त्या संताचं दर्शन घेतल्याखेरीज कधी घरी परत जाणार नाहीं ! येऊन जाऊन काय ती आपली माझ्या हातांतल्या ह्या ताटावरच ना दृष्टि