पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/25

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १ ला. १५ ( ताट पुढे करून ) हैं घ्या आपलं ताट, नी करा मला एकदांची मोकळी ! ( हरभट ताट घेतो.) माझा आपला हा दोन हातांचा नमस्कार हा तर आहेना माझ्या सत्तेचा? तेवढाच पुरे माझा मला ! त्या सत्पुरुषांना माझा नुसता नमस्कारच पुरे ! हातांत माती घेतली तर तिचं सोनं करण्याचं त्या सत्पुरुषांचं सामर्थ्य ! तेव्हां ते थोडेच सुजले आहेत तुमच्या या धनद्रव्याला! देव काय भावाचा भुकेला ! विदुराच्या कण्या नी सुदाम्याचे पोहे, नाहीं का खाल्ले श्रीकृष्णांनीं ? झालं तर, माझा भाव त्या सत्पुरुषांच्या ठिकाणी आहे, तोच माझं करील काम ! पण ताट हातीं आलं तेव्हां आता पडला ना आपला जीव एकदांचा खालीं ? इथे काळजी काय ती द्रव्याची ! ह्मणून पुसते ? । हरभट- हो, हो ! पडला जीव खालीं ! आतां तुला दाही दिशा मोकळ्या आहेत ! जा; वाटेल तिकडे जा ! पार्वती०- हो, आता मला दाही दिशा मोकळ्या व्हायच्या, तें होतच मला ठाऊक ! पण झटलं, एकदा तरी त्या संतांचं दर्शन घ्यायचं होतं हो ! ह्मणजे ( डोळ्याला पदर लावून ) माझ्या बगडीच्या पाठीवर आजपावतर आठ खळींत नेऊन पुरलींत ! तशी, त्यांची कृपा झाली तर, नवव्यानदा तरी पाळी यायची नाहीं ह्मणतें ! बाकी इकडे पोरं नकोत ! वाळे, नकोत ! बायको मेली नकोच आहे ह्मणा ! एक पैका मिळाला म्हणजे सारं मिळालं !! इश्श ! पाठ वळवून चालू लागायला जरूं कांहीं तरी वाटतं आहे। का मनाला ? आपण मेली बडबड करावी नी स्वस्थ बसावं इतकंच !! ( गगेकडे निघून जाते. ) । हरभट-गेली एकदांची व्याद! माझ्या मागची ही जिवंत साडेसाती परमेश्वर कधी सोडवील तो सुदिन ह्मणायचा ! ( हरभट घराकडे जाऊ लागतो, इतक्यांत मोर दिक्षित फुलांच्या माळांनी भरलेलें तबक हातांत घेऊन येतात.) मोर०-( हरभटास पाहून ) नमोनमः नमोनमः, हरभटजी ! अहो पण तुह्मी माघारे कोठे वळला ? हर- अहो दीक्षित, गंगेवरच निघालों होतो. बरोबर तिलाही