पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/26

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ श्रीज्ञानेश्वरमहाराज. घेतली होती. पण येथवर आल्यावर मग तिला झालें खिरापतीचे स्मरण. अजागळ कोठली ! खिरापत विसरली या ताटांत घालायची ! तेव्हा तिला झटले तू हो पुढे; मी घरी जाऊन खिरापत घेऊन येतों तुझ्या मागोमाग. तिला पुढे पाठविली आणि मी घरीं जाण्याकरितां हा इतक्यांतच मागे वळलो. मोर०- होय ना ? जाऊं या हो. तेवढ्या खिरापतीकरितांच नका आतां वराकडे परतू. अहो, या बायकांचे हे असेच आहे ! आमचीने हा हार करायला तीन प्रहर घेतले ! आणि त्यामुळे मला गंगेचे दोन हेलपाटे पडले ! हरभटजी, तुह्मांला काय सांगू ? न भूतो न भविष्यात अशी यात्रा लोटली आहे आज गंगेवर ! श्रीज्ञानेश्वर सद्रूंचा केवढा हो हा अगाध महिमा ! हर-हे काय विचारतां दीक्षित ? अहो, प्रत्यक्ष परमेश्वरच ते ! मग यात्रा लोटली यांत आश्चर्य ते कोणते ? मोर०-हरभटजी, जी श्रुति एक तप घालवूनही तुम्हां आम्हांला प्राप्त होण्याची मारामार, तीच श्रुति, हे प्रभु, आपल्या आंगच्या योगसामर्थ्याने वाचारहित आणि ज्ञानशून्य पशूकडून प्रत्यक्ष वेदनारायणाप्रमाणे न्यासपूर्वक म्हणवीत आहेत ! तेव्हां केवढे या जगद्गुरुंचे अद्भुत सामर्थ्य ! ! अहो तुम्ही आम्ही प्रत्यक्ष आपल्या हातांनी ज्यांची शवें चितेवर रचून तीं यथाविधि अमिनारायणाच्या मुखांत लोटली, आणि त्यांची राख झाल्यावर ज्यांच्या अस्थि गंगार्पण केल्या, त्या गोविंदभटांना, कृष्णंभटांना, दादंभटांना आणि वीरेश्वर दीक्षितांना ‘देवाः आगंतव्यं पितरः आगंतव्यं ? असे म्हणून स्वर्गातून आवाहन करून, कृष्णाजीपंताच्या घरी पितृतिथीला देवस्थानी आणि पितरस्थानी पाटावर आणून बसवून, वेदोक्त विधीने श्राद्धविधि उरकून घेण्याचे अवाटत रुत्य, भटजी, अवतारीक पुरुषांवांचून सामान्य मनुष्यांच्या हातून कधीं । होईल काय ? आणि अशा प्रभुंना आम्ही आज शुद्धिपत्र देणार तेव्हां धिक्कार असो आम्हांला ! अहो, हे प्रभु बालवयांतच पाहिलेतना कसे शांत, मनोनिग्रही, समाधानी, तृप्त, मायोपाधिविरहित, हर्षशोकदुःखविवर्जित, उत्तम-अधमाबद्दल समबुद्धि, लौकिक,