पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/27

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ अंक १ ला. १७ कीर्ति, लाभ, हानि, यांविषयी उदासीन आणि सदाहरिभजनीं रत आहेत ते ! ( इतक्यांत ज्यांत शेलापागोटे ठेवलेले आहे असे ताट हातात घेऊन रामशास्त्री लगबगीने येतात.) | राम-नमो नमः दीक्षित ! भटजी नमो नमः ! अहो, तुम्ही अजून मागेच ? काय म्हणावे तुमच्या चेंगटपणाला ! पाय जरा झरझर उचला ! श्रीजगद्गुरुंच्या दर्शनाचा हा अत्यानंदाचा सुख : सोहळा तुमच्या आमच्या नेत्रांना या जन्मीं पुन्हा पाहावयास मिळणार नाहीं ! आज श्रीगंगातटाक प्रतिवैकुंठनगर बनून गेला आहे ! वर्णावर्णाचा अभिमान टाकून आणि उच्चनीच भाव विसरून भक्तियुक्त अंतःकरणाने श्रीजगदुरूची बोळवण करण्याकरिता एकत्र जमलेला हा नरनारीवृंद पाहून, अहाहा ! दीक्षित, हृदय कसे उचंबळून येत आहे !! आणि * कर्तुमकमन्यथाकर्तुम् ' असे ज्यांचे सामर्थ्य, त्या श्रीजगदुरूंना आह्मीं आज प्रतिष्ठानवासी ब्राह्मण कर्मठपणाच्या अभिमानास चढून शुद्धिपत्र देणार ! तेव्हां केवढे हो हे आमचे थोर अज्ञान !! मो०- शास्त्रीबुवा, हरभटजींना मी हेच ह्मणत होत ! अहो प्रामाधिका-यांचाच हा आग्रह आणि शिवाय चतुर्धर पंडित, बोपदेव पंडित, अशा सर्वमान्य श्रेष्ठांची त्यांना अनुकूलता ! मग हो आपले काय चालणार ? हर०- नाहीं पण दीक्षित, असें कां बरें ह्मणतां ! अहो शास्त्रीबुवा, श्रीमद्देवगिरिवराधिप यदुकुलोत्पन्न गोब्राह्मणप्रतिपालक श्रीराजाधिराज रामचंद्रराजे, यांचे श्रीकरणाधिप जगद्वंद्य हेमाद्रिपंडित, ज्यांनीं चतुर्विधचिंतामणीसारखा परमपूज्य ग्रंथ लिहून चारी वर्णीच्या लोकांना व्रते, दानें, तीर्थं आणि मोक्ष यांची यथासांग फोड करून दिली, त्या हेमाद्रिपाडतांचे बोपदेवपंडित हे। आश्रित ! मुक्ताफळ, हरिलीला, मुक्तबोध असे असे ग्रंथ ज्यांनी लिहिले, ज्यांनी श्रीरामानंदस्वामीचे शिष्य आणि राघवरहस्य ग्रंथाचे कर्ते वामनपांडत यांना व्याकरणशास्त्राच्या वादांत जिंकिलें, त्या ह्या बोपदेवपंडितांची योग्यता कशी बरें कमी होईल ?