पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/28

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ श्रीज्ञानेश्वरमहाराज. तेव्हा त्यांनी क्षेत्रांतील यति, वैदिक, शास्त्री, हरदास, पुराणीक या सर्वांच्या मान्यतेने या जातिहीनना शुद्धिपत्र देण्याचा जो विचार केला आहे, तो म्हणजे अगदीच मूर्खपणाचा आहे असे मला तरी निदान वाटत नाहीं ! राम- अहो भटजी, हे तपोनिधि आणि अद्वितीय ज्ञानाचे स्थान प्रभु कोणीकडे आणि संसारमायाबद्ध अज्ञानाचे केवळ निधिच असे ते पंडित कोणीकडे ! आपपरभाव विसरून जाऊन सदा उल्हासवृत्तीने राहणारे हे जगाचे आदिगुरू कोणीकडे ? आणि माझे तुझे करून अहंपणाने चढून जाऊन सदा प्रपंचचिंता वाहणारे ते मूळ पंडित कोणीकडे ? कोणीकडे या प्रभूची फलभोगाविषयीं निरिच्छा ? आणि कोणीकडे त्या कर्मठपंडितांची उदरभरणाची चिंता ! जे पवित्र तीर्थांनाही पवित्र, पूर्णपर ब्रह्म, ज्यांनी अविवेकरूपी बाल्यावस्थेचा त्याग करून विरक्तीचा परिग्रह केला, असे हे संसारश्रांतांची साउली आणि अनाथजीवांची माउली प्रभु कोणीकडे ? आणि जे सदा अपवित्र, विषयसुखांत रममाण होणारे, संशयविकल्पाने ग्रासलेले, भ्रमाने वेडावलेले, संसारजालाने दुग्ध झालेले, आणि घोरकर्मास प्रवृत्त होणारे असे हे भ्रष्टबाढ़ पैशुन्यवादी पंडित कोणीकडे ! भटजी, हा कुटिलभाव टाकून त्या परात्पर जगद्गुरूंना आमच्याबरोबर अनन्यभावानें शरण चला, म्हणजे त्यांच्या कृपादृष्टीने तुम्ही हा भव तरून जाल ! मो०- शास्त्रीबुवा, आपण आजपर्यंत देहाला कष्ट देऊन, पदें, जटा, क्रम, घनसहित वेद, व्याकरण, न्याय, मीमांसा आणि धर्मशास्त्र आदिकरून वेदशास्त्रांचे अध्ययन केलें ! विद्वत्तेच्या अभिमानाने सभेत अपमान केला ! शास्त्रबाह्य आचरण करणारांना बहिष्कार शंकडों पंडितांचा घातले ! परंतु आपली स्वतःची सोय पाहिली नाहीं ! ! ज्या परमेश्वराने कपाळू होऊन आपल्याला अगाध शक्ति दिली, त्याचे भजन आणि उपासना केली नाहीं ! त्याला अनन्यभावाने शरण रिबालों हीं ! प्रपंच आणि लौकिक यांच्या पाठीस लागून