पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/29

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १ ला. आपण आपले स्वाहत सांडलें !! परंतु आपण जन्मोजन्मीं केलेले पुण्य फळास आल्यामुळेच त्रैलोक्याची केवळ ज्ञानसंजीवनी आणि आपले सकल मनोरथ पूर्ण करणारी कामधेनु, श्रीज्ञानेश्वरमहाराज, यांच्या मंगलप्रद दर्शनाचा आणि अर्थप्रद उपदेशाचा आपल्याला अल्प काल तरी लाभ झाला !! आणि अशा अत्यंत दुर्लभ सत्समागमाला आपण आज अंतरणार म्हणून शास्त्रीबुवा मनाला अत्यंत हुरहुर लागली आहे !! | राम०- खरे आहे दीक्षित ! तुमचे आमचे भाग्य थोर म्हणूनच अल्पकाल तरी या संतांच्या संगतिसुखाचा अपूर्व लाभ आपल्याला मिळून सर्वत्र ब्रह्मानंदाचा सुकाळ झाला ! आजचा हा पर्वकाळ खरोखरीच अत्यंत थोर होय ! हातांत पंचारत्या घेऊन उभ्या असलेल्या या युवतिजनांकडे पाहून, दीक्षित, मला तर आज या साक्षात् जलदेवताच श्रीजगद्गुरूंना ओवाळण्याकरितां गंगेतून वर आल्या आहेत की काय असा भास होत आहे ! आणि हा जनसमूह, प्रत्यक्ष देवच, आज चतुर्भुज परमात्मा श्रीविष्णु याच्या पूजनाकरिता स्वर्गातून खाली उतरला आहे, असे वाटत आहे !! अहाहा ! दीक्षित, असा हा अत्यानंदाचा लाभ जर आपल्याला निरंतर घडेल तर सायुज्यपदप्राप्तीचे सुख आपल्याला या भूलोकींच अखंड भोगावयास सांपडेल यांत संशय नाहीं ! ! !