पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/30

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीज्ञानेश्वरमहाराज. प्रवेश तिसरा, स्थळ-- प्रतिष्ठान (पैठण ) क्षेत्र. श्रीगोदातटाक. ( पडदा उघडून श्रीज्ञानेश्वरमहाराजांस ओवाळण्याकरितां हातांत पंचारत्या घेतलेल्या स्त्रिया आणि श्रीज्ञानेश्वरमहाराजांस अर्पण करण्याकरितां नानाविध वस्तूंनी भरलेली ताटें हातांत घेतलेले चतुधर पंडित, बोपदेव पंडित, आदिकरून श्रेष्ट ब्राह्मण व इतर नागरिकजन उभे आहेत असा श्रीगोदातटाकाचा देखावा दृष्टीस पडतो. रामशास्त्री, हरभट, मोरदीक्षित, हे या जमलेल्या मंडळींत येऊन उभे राहतात. इतक्यांत महिष मुखाने खालील वेदवाक्ये ह्मणत रंगभूम.वर येतो. ) । | अयमझे जरितात्वेऽअभूदपि सहसः सूनोनत्व १ न्यदस्त्याप्यं ॥ भद्रं हिशर्म त्रिवरूथ मस्तितऽआरे हिंसाना मप दिद्युमाकृधि ॥ प्रवतेऽअनेजनि मापितूयतः साची वविश्वाभुवनान्यूजसे ॥ प्रसप्तयः प्रसनिषेत नो धियः पुरश्चरति पशुपाऽइवत्मना ॥ उतवाऽउपरि वृणक्षि बप्सद्वहोरझऽउलपस्य स्वधावः ॥ उतखिल्याऽउर्वराणां भवति माते हे तितविषीं चुक्रुधाम ॥ ( सर्व मंडळी ‘ वेदोनारायण, नमस्तुभ्यं ' असें ह्मणत महिषास नमस्कार करतात. महिषाचे वेदपठण चालू असतां, विठ्ठलपंत, रुक्मिणीबाई, श्रीनिवृत्तिनाथमहाराज, श्रीज्ञानेश्वरमहाराज, सोपानदेव आणि मुक्ताबाई एकामागून एक रंगभूमीवर येतात. त्यांस पाहून सर्व ब्राह्मण मंडळी व इतर लोक अत्यंत सद्गदित अंतःकरणाने अश्रुभरित नेत्रांनी अहंभाव सोडून साष्टांग नमस्कार घालतात व युवातिजन त्यांस नमरकार करून पंचारत्यांनी ओवाळतात.) ज्ञानेश्वर- भो माहिषा, ( महिप वेदपठण थांबवून श्रीज्ञानेश्वरमहाराजांकडे पाहतो.) मुंगीपासून तों ब्रम्हदेवापर्यंत अखिल प्राणीमात्रांच्या ठायीं भरून राहिलेले जगदूप चैतन्य एकच आहे