पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/32

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ श्रीज्ञानेश्वरमहाराज. पुन्हा त्याची उत्पत्ति करण्याचे सामथ्य तुमच्या अंगी आहे ! तुम्हीं नहुष सर्पाला स्वर्गाधिपति करून सोडलें ! श्रीकृष्ण परमात्म्याला लाथेने मारलें ! तो तुमचा लत्ताप्रहार भगवान् श्रीकृष्ण आपल्या हृदयावर भूषण ह्मणून वागवीत आहेत ! तुमचे शब्द तीक्ष्ण खङ्ग आहेत ! तुम्हांला ब्रह्मादिकही कांपतात ! रमादेवी अति चंचल, परंतु तुमच्या आशीर्वादळाने श्रीविष्णूचें पादकमल ती क्षणभरही सोडीत नाहींशी झाली! तुमच्या आशीर्वादबळाने रुद्र या विश्वाचा संहार करून तत्क्षणींच शुद्ध होतो ! तुमच्या आशीर्वादानें वैश्वानर अपार तेजयुक्त होऊन सर्व पदार्थ भक्षण करतो आणि यत्किंचितही मलीन न होतां अखेर त्रिभुवनही जाळतो ! तुमच्या दर्शनाने अनंत जन्मांची पापें जळून जातात ! तुह्मांस साष्टांग नमस्कार घातला असतां कल्याणप्राप्ति होते ! आणि तुमचे पूजन केले असतां अच्युतपदाची जोड मिळते ! अशा तुह्मां श्रेष्ठांचा मी एका मुखाने कोठवर स्तव करावा ? पतितांवर दया करणे हे तुमचे ब्रीद आहे ! आह्मी सर्व पतित, पंगु, दुर्बळ आहों ! तरी तुमची चरणधूलि आमच्या मस्तकांवर लोटून, अहो श्रेष्ठहो, तुझी आमचे हे अमंगळ देह पावन करावे, हेच तुमच्यापाशी या अज्ञ ज्ञानदेवाचें करद्वय जोडून मागणें आहे! बोपदेव- विठ्ठलपंत, रुक्मिणी मातोश्री, श्रीनिवृत्तिनाथमहाराज, श्रीज्ञानराजसमर्था, सोपानदेवा, चित्कला मुक्ताबाई, हा प्रतिष्ठानवासी सकल बम्हवृंद व नागरिकजन पूर्ण पश्चात्तापयुक्त अंतःकरणाने तुम्हांस अनन्यभावाने शरण आला आहे ! तरी, अहो कृपानिधि, आपण सदय होऊन आमच्या सर्व अपराधांची क्षमा करावी ! दीन अज्ञान जनांचा उद्धार करण्याकरितांच या भूलोकीं अवतार घेतलेले आपण साक्षात् शिव, विष्णु, ब्रह्मा आहा ! तेव्हां अशा तुम्हां प्रभंना आम्हीं यःकश्चित् पामरांनी काय पावन करावें ? आम्ही वेदशास्त्राभिमानाने वेडे झाल्यामुळे तुम्हांस न ओठरवून व्यर्थ जातिदोष लावून तुमचा छल केला, याबद्दल आह्मां सर्वास आपण क्षमा करावी. चतुर्धर- अहो ज्ञानराजा, आह्मा जड जीवांना उपदेशामृत